Election Commission Decision on NCP Sarkarnama
देश

Sharad Pawar: 'जो अपना नहीं हुआ वो जनता का क्या होगा'; शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेर झळकले बॅनर

Election Commission Decision on NCP:शरद पवार गटाला नव्याने पक्ष बांधणी करावी लागणार

Mangesh Mahale

New Delhi: केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गटाला दिलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादीच्या चिन्ह व नावासंदर्भात अजित पवार व शरद पवार या दोन्ही गटांच्या कुठल्या गटाकडे चिन्ह व पक्षाचे नाव जाणार यावर निर्णय पार पडल्यानंतर, राज्यात अजित पवार गटाकडून फटाके फोडत व पेढे भरवत जल्लोष साजरा करण्यात आला आहे. दुसरीकडे शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर आज सकाळी बॅनर लावून अजित पवारांना टोला लगावला आहे.

'जो अपना नहीं हुआ वो जनता का क्या होगा,' अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे. शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा देखील नाव व चिन्हाचा निर्णय राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या घटकांना मिळाला आहे. अजित पवार गटाचे कार्यकर्ते व पदाधिकारी आनंदोत्सव साजरा करीत आहेत.

दोन्ही गटांनी आपणच अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहोत, म्हणून निवडणूक आयोगात धाव घेतली होती. मंगळवारी त्यावर सुनावणी झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मागच्यावर्षी जुलै महिन्यात दोन गट पडले होते.

आगामी लोकसभा निवडणुकीवर या निकालाचे राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अजित पवार गट अधिकृत पक्ष असल्याने त्यांच्यासाठी बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या आहेत. शरद पवार गटाला नव्याने पक्ष बांधणी करावी लागणार आहे. विधानसभा आणि लोकसभेतील बहुमत हे अजित पवार गटाच्या बाजूने होतं. तेच निर्णायक ठरल्याचं निवडणूक आयोगाच्या सुनावणीवरुन दिसते.

पक्ष आणि चिन्हाबाबत निकाल देताना पक्ष संघटनेतील पदाधिकारी आणि सदस्यसंख्येनुसार निर्णय देण्याऐवजी निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या प्रकरणाप्रमाणेच लोकप्रतिनिधींचे विधिमंडळातील बहुमत लक्षात घेऊनच अजित पवारांच्या बाजूने हा निकाल दिला आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गटच खरा राष्ट्रवादी पक्ष असा निकाल निवडणूक आयोगाने दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT