Narendra Modi and Sharad Pawar
Narendra Modi and Sharad Pawar Sarkarnama
देश

Sharad Pawar : शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना पत्र; म्हणाले,''तुमच्या आयुष्यातील या कठीण प्रसंगाची..!''

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar's letter to Pm Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांनी नुकतीच वयाची शंभरी पूर्ण केली आहे. मात्र, प्रकृती खालावल्यामुळे त्यांना अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर तिथे उपचार सुरु आहे. मोदी यांनी देखील आईच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी थेट अहमदाबाद गाठले आहे. याच दरम्यान हीराबेन मोदी डॉक्टरांच्या उपचाराला प्रतिसाद देत असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती समोर येत आहे.

नरेंद्र मोदीं (Narendra Modi) च्या आईच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून काँग्रेसचे नेते व खासदार राहुल गांधी,प्रियंका गांधी यांच्यासह देश विदेशातील अनेक नेत्यांनी प्रार्थना केली आहे. याचवेळी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील मोदींच्या आई हिराबेन मोदी यांच्या उत्तम स्वास्थासाठी प्रार्थना केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले असून त्यात त्यांच्या आईच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. याच पत्रात त्यांनी हीराबेन मोदी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना केली आहे.

पवार पत्रात लिहितात, तुमच्या मातोश्री अहमदाबादच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. तुम्ही त्यांना काल भेटण्यासाठी गेला होतात. तुमच्या आईची प्रकृती स्थिर असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं ऐकून बरं वाटलं. तुमचं तुमच्या आईवर किती प्रेम आहे आणि तुम्ही आईच्या किती जवळ आहात हे मला माहीत आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील या कठीण प्रसंगाची मला जाणीव आहे.

तसेच आई हा पृथ्वीवरील सर्वात शुद्ध आत्मा आहे. तुमच्या जीवनाला आकार देण्यासाठी तुमची आई ऊर्जा आणि निरंतर शक्तीचं स्त्रोत राहिल्या आहेत. त्यांना लवकरात लवकर बरे वाटावे आणि त्यांची प्रकृती ठणठणीत व्हावी म्हणून मी प्रार्थना करतो. तसेच मोदी यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छाही पवार यांनी दिल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT