Shashi Tharoor  Sarkarnama
देश

Shashi Tharoor Alert Congress : कर्नाटकातील विजयाने अति उत्साही होऊ नका ; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा घरचा आहेर

सरकारनामा ब्यूरो

Karnataka News : नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा सुपडा साफ केला आहे. त्यामुळे सध्या काँग्रेसमध्ये 'अच्छे दिन'असल्याचे म्हटलं जाते. पण अतिउत्साही असलेल्या काँग्रेसचे त्यांच्याच ज्येष्ठ नेत्याने कान टोचले आहे.

"कर्नाटकमधील विजयाने काँग्रेसने अति उत्साही होऊ नये," असा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी दिला आहे.काँग्रेसच्या इतिहासाची आठवण शशी थरुर यांनी करुन दिली. त्यांनी पदाधिकाऱ्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

"कर्नाटकात भाजपचा पराभव केल्यानंतर काँग्रेसने आत्मसंतृष्ट होऊ नये, कारण मतदार हे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आपले मत बदलू शकतात. मतदारांचे मत कधी बदलेल हे सांगता येत नाही," असे थरुर यांनी म्हटलं आहे. ते जयपूर साहित्य मेळाव्यात बोलत होते.

शशी थरुर यांनी काँग्रेसला सल्ला देताना राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ विधानसभेच्या निवडणुकीची विजयानंतर २०१९ मध्ये मध्ये झालेल्या काँग्रेसच्या पराभवाची आठवण करुन दिली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागले, याची आठवण त्यांनी करुन दिली.

"कर्नाटक विधान सभेच्या एकूण २२४ जागापैकी १३५ जागा काँग्रेसने पटकावल्या आहेत.या निवडणुकीत राष्ट्रीय अध्यक्ष मलिकार्जून खर्गे, राहुल गांधी, प्रियंका गांधी आदी प्रचारात उतरले होते. स्थानिक मुद्यांवरुन काँग्रेसने ही निवडणूक लढवली, याकडे काँग्रेसने लक्ष केंद्रीत केले पाहिजे," असे थरुर म्हणाले.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT