Shashi Tharoor
Shashi Tharoor sarkarnama
देश

थरूर काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतात; सोनिया गांधींनी दिला हिरवा कंदील?

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षपदाच्या निवडीवरून पक्षात अंतर्गत हालचाली वाढल्या आहे. गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान आणि दिल्लीसह अनेक राज्यांतील काँग्रेस समित्यांनी खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड करण्याचा ठराव मंजूर केला. मात्र, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर हेही पक्षाध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरणार आहेत. त्यासाठी त्यांना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी परवानगी दिली, असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

थरूर यांनी सोमवारी दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, थरूर यांना पक्षाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्यास त्यांच्याकडून मंजुरी मिळाली आहे. सोनिया गांधी म्हणाल्या आहेत की, जर त्यांची थरूर यांची इच्छा असेल तर ते पक्षाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवू शकतात. कोणीही निवडणूक लढवू शकतात, असे म्हटल्याची माहिती आहे. असे असले तरी ते सोनिया गांधी यांना कोणत्या संदर्भात भेटले, हे थरूर यांनी सांगितले नाही. थरूर यांनी सभापतीपदासाठी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. दरम्यान, त्यांची सोनिया गांधी यांची भेट झाली आहे.

काँग्रेसचा पुढील अध्यक्ष कोण होणार याबाबत अद्यापही सस्पेंस कायम आहे. राहुल गांधी यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यानंतर हा सस्पेंस आणखी वाढला. 'भारत जोडो' यात्रेचे नेतृत्व करत असलेले खासदार राहुल गांधी म्हणाले "मी पक्षाध्यक्ष होणार की नाही, हे अध्यक्षपदाच्या निवडणुका झाल्यावर स्पष्ट होणार आहे. मात्र, मी स्पष्टपणे ठरवले आहे. मी तेच करेन आणि माझ्या मनात कोणताही भ्रम नाही.

काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना 22 सप्टेंबरला जारी होणार आहे. 24 ते 30 सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु असणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 8 ऑक्टोबर आहे. 17 ऑक्टोबरला मतदान होईल आणि 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT