Narendra Modi, Shashi Tharoor, Rahul Gandhi Sarkarnama
देश

Shashi Tharoor praises PM Modi : पंतप्रधान मोदींविषयी थरूर यांच्या एका शब्दानं काँग्रेस घायाळ; नेमकं काय म्हणाले?

Shashi Tharoor Commends PM Modi’s Global Presence : शशी थरूर यांच्याकडून मागील काही महिन्यांपासून सातत्याने पंतप्रधान मोदींचे कौतुक केले जात आहे. केरळमधील त्यांच्या एका कार्यक्रमातही ते सक्रीयपणे सहभागी झाले होते.

Rajanand More

Impact of Modi’s Global Image on Indian Diplomacy : काँग्रेसचे केरळमधील खासदार शशी थरूर यांनी पुन्हा एकदा पक्षाला डिवचले आहे. त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे तोंडभरून कौतुक केले आहे. एवढेच नाही तर मोदींच्या विविध उपक्रमांबाबत त्यांना अधिक समर्थन देण्याचे आवाहनही केले आहे. काँग्रेसच्या धोरणांविरोधात जात थरूर यांनी पुन्हा एकदा नेत्यांची नाराजी ओढवून घेतली आहे.

शशी थरूर यांच्याकडून मागील काही महिन्यांपासून सातत्याने पंतप्रधान मोदींचे कौतुक केले जात आहे. केरळमधील त्यांच्या एका कार्यक्रमातही ते सक्रीयपणे सहभागी झाले होते. त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावरही गेले होते. ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका मांडण्यासाठी जगभरात गेलेल्या शिष्टमंडळांपैकी एक शिष्टमंडळाचे ते प्रमुख होते. अनेकदा त्यांनी अप्रत्यक्षपणे पक्षाच्या भूमिकेचा विरोध केला आहे.

द हिंदूमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखामध्ये थरूर यांनी मोदींचे कौतुक केले आहे. जागतिक स्तरावर ते भारतासाठी 'मौल्यवान' असल्याचे थरूर यांनी म्हटले आहे. तसेच पंतप्रधान मोदींच्या ऊर्जा, गतिशीलता आणि दुसऱ्या देशांसोबत चांगले संबंध निर्माण करण्याच्या त्यांच्या इच्छेसाठी अधिक समर्थन देण्याचे आवाहनही थरूर यांनी केले आहे.

विदेश दौऱ्यामध्ये थरूर यांनी म्हटले होते की, ‘भारताने पहिल्यांदाच २०१५ मध्ये कारवाई करण्यासाठी नियंत्रण रेषा पार केली होती.’ त्यांच्या या विधानानंतरही वाद निर्माण झाला होता. काँग्रेसचे माजी खासदार उदित राज यांनी भाजपचे सुपर प्रवक्ते असा त्यांचा उल्लेख केला होता. शिष्टमंडळाचे नेतृत्वावरूनही वाद झाला होता. काँग्रेसने त्यांच्या नावावर फुली मारली होती.

आपल्या निर्णयाचा बचाव करताना ते म्हणाले होते की, 'संसदेच्या परराष्ट्र धोरणांसंबंधिच्या समितीचे अध्यक्ष बनल्यानंतर स्पष्ट केले होते की आपले लक्ष भारताच्या परराष्ट्र धोरणांवर आणि राष्ट्रीय हितावर असेल. काँग्रेस आणि भाजपच्या परराष्ट्र धोरणांवर नव्हे.’ त्यांनी विदेशात मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणांचे कौतुक करताना काँग्रेसच्या विरोधाची धार बोथट केली होती.

केरळमधील विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आपल्याला प्रचारात आमंत्रित करण्यात आले नाही, असा दावा करत थरूर यांनी अप्रत्यक्षपणे आपल्याला पक्षात डावलले जात असल्याचे सूचक विधान केले होते. पण पक्षाने याबाबत खुलासा करताना त्यांना याबाबत कळवले होते, असे स्पष्ट केले होते. थरूर हेच त्यांच्या विदेश दौऱ्यात व्यस्त असल्याचे पक्षाच्या केरळमधील नेत्यांनी म्हटले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT