Shelly Oberoi is the new mayor of Delhi Sarkarnama
देश

Delhi Mayor Election : 'आप'ने मैदान मारलं; शैली ओबेरॉय दिल्लीच्या नव्या महापौर

डिसेंबर महिन्यात दिल्ली महापालिकेची निवडणूक झाली होती. पण अडीच महिने उलटूनही अद्याप दिल्लीला महापौर मिळाला नव्हता.

सरकारनामा ब्यूरो

Delhi Mayor Election : आम आदमी पक्षाच्या शैली ओबेरॉय (Shelly Oberoi) या दिल्लीच्या नव्या महापौर झाल्या आहेत. शैली ओबेरॉय यांना150 मतं मिळाली. त्यांनी भाजपच्या रेखा गुप्ता यांचा पराभव केला. रेखा गुप्ता यांना 116 मते पडली.

डिसेंबर महिन्यात दिल्ली महापालिकेची निवडणूक झाली होती. पण अडीच महिने उलटूनही अद्याप दिल्लीला महापौर मिळाला नव्हता. या प्रकरणात आपने न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायलयाने दिलेल्या निर्देशानंतर आज महापौरपदासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यात आपच्या शैली ओबेरॉय विजयी झाल्या.

दिल्ली महानगरपालिका (DMC) अधिनियम, 1957 नुसार, महापालिका निवडणुकीनंतर सभागृहाच्या पहिल्या सत्रात महापौर आणि उपमहापौरांची निवड केली जाते. मात्र, महापालिका निवडणूक होऊन दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. 4 डिसेंबर 2022 रोजी महापालिकेची निवडणूक झाली होती.

याआधीही असे तीन वेळा महापौर पदासाठी घेतलेल्या निवडणूक घेण्याचे प्रयत्न झाले. मात्र भाजप आणि आम आदमी पक्षाच्या नगरसेवकांच्या गदारोळात ही महत्त्वाची निवडणूक पुढे ढकलावी लागली. तीन अयशस्वी प्रयत्नांनंतर आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आज दिल्लीला नवा महापौर मिळेल, अशी अपेक्षा आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात घटनेच्या कलम 243 R नुसार नामनिर्देशित नगरसेवकांना मतदान करण्यात मनाई करण्यात आली आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी गेल्या आठवड्यात कॉर्पोरेशन सभागृहाची बैठक बोलावण्यास मंजुरी दिली होती. त्यानंतर महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीच्या सहा सदस्यांच्या निवडणुकीची तारीख आज २२ फेब्रुवारी निश्चित करण्यात आली.

17 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने महापौर, उपमहापौर आणि नागरी संस्थेच्या स्थायी समितीच्या सदस्यांच्या निवडणुकीची तारीख निश्चित करण्यासाठी दिल्ली महानगरपालिकेची (MCD) पहिली बैठक बोलावण्यासाठी 24 तासांच्या आत नोटीस जारी करण्याचे आदेश दिले होते. सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या (आप) महापौरपदाच्या उमेदवार शैली ओबेरॉय यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला. तसेच, उपराज्यपालांनी एमसीडीसाठी नामनिर्देशित केलेले सदस्य महापौर निवडण्यासाठी मतदान करू शकत नाहीत, असेही न्यायालयाने निर्देश दिले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT