Priyanka chaturvedi
Priyanka chaturvedi  Sarkarnama
देश

उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेला प्रचारापासून रोखलं; प्रियंका चतुर्वेदींचा संताप

सरकारनामा ब्युरो

लखनौ : उत्तरप्रदेशमध्ये सध्या निवडणुकांचे वातावरण आहे. भाजप, काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाजवादी पक्षासह इतर छोटे आणि प्रादेशिक पक्ष या निवडणुकीत संपूर्ण तयारीनिशी उतरले आहेत. प्रचार, आरोप-प्रत्यारोप, भेटी-गाठी अशा गोष्टींनी राज्याचे राजकारण ढवळून निघत आहे. मात्र अशातच आता उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत शिवसेनेला प्रचार करण्यापासून रोखल जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केला आहे. त्या लखनौमध्ये बोलत होत्या.

प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, मी आज इथे रोड शो करण्यासाठी आले होते. मार्ग देखील ठरला होता. सगळे काही नियोजित होते. मात्र शेवटच्या क्षणी या 'रोड शो' ला परवानगी नाकारण्यात आली. रिटर्निंग अधिकारी यांनी सांगितले की ते मार्गाला परवानगी देणार नाहीत. १४ ते १५ पोलिस अधिकारी तिथे आले आणि सांगितले की तुम्ही रोड शो करु शकत नाही. त्यानंतही तुम्ही केला तर आम्ही तुम्हाला डिटेन करु, अशी धमकी दिली असा आरोप देखील चतुर्वेदी यांनी यावेळी केला. यानंतर प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजपविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. पश्चिम उत्तर प्रदेश, बुंदेलखंड आणि अवध अशा तीन विभागांमध्ये विभागलेल्या १६ जिल्ह्यांमधील ५९ विधानसभा मतदारसंघांत मतदान होत आहे. या तिसऱ्या टप्प्यात समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या करहल मतदारसंघातही मतदान पार पडत आहे. यापूर्वी उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यात ६० टक्के तर दुसऱ्या टप्प्यात ६४ टक्के मतदान झाले होते. यानंतर आता चौथ्या टप्प्यातील मतदान २३ फेब्रुवारी, पाचव्या टप्प्यातील २७ फेब्रुवारी, सहाव्या टप्प्यातील ३ मार्च आणि सातव्या टप्प्यातील ७ मार्च रोजी मतदान हणार आहे. तर मतमोजणी १० मार्च रोजी होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT