Uddhav Thackeray Latest Marathi News, Eknath Shinde Latest News, Shiv Sena Latest News
Uddhav Thackeray Latest Marathi News, Eknath Shinde Latest News, Shiv Sena Latest News Sarkarnama
देश

शिवसेनेत लवकरच मोठा भूकंप; ठाकरेंना एकटे पाडण्याचा दिल्लीतून डाव!

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : संसदेच्या (Parliament) पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात झाल्यानंतर शिवसेनेसाठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिंदे गटाच्या बैठकीत चौदा खासदारांनी ऑनलाईन माध्यमातून सहभाग घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली. हे खासदार शिंदे गटात सहभागी झाल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान, आमदारांपाठोपाठ आता खासदारांनाही फोडण्यासाठी दिल्लीतून कुटील डाव रचला जात असल्याची कबुलीच खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी दिली आहे. (Shiv Sena Latest News)

शिवसेना फोडण्याचे षडयंत्र दिल्लीतून रचले जात असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना राऊतांनी हे आरोप केले आहेत. प्रत्येकाच्या कारवायांबाबत आमच्याकडे माहिती आहे. कोण कुठे जातो, कोण कुणाला भेटतो हे माहिती आहे. काही जणांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिली आहेत. आमचा नाईलाज आहे, आम्हाला ओढलं जातंय. आमच्यावर दबाव आहे, असं या खासदारांचं म्हणणं आहे. काहींनी मेसेज पाठवले आहेत, असं राऊतांनी सांगितलं.

खासदारांवर चौकशीचा, ईडीचा, आयटीचा दबाव टाकले जात आहेत, हे सत्य आहे. पन्नास खोके तर आमदारांपर्यंत चालले होते. तर खासदारांसाठी आणकी दहा खोक्यांचा भाव वाढल्याचे कानावर आले आहे. खासदारांना अमिष दाखवले जात आहे. सर्व खासदारांना आम्ही व्हीप बजावलेला आहे. त्यांच्यावर आमचा विश्वास आहे, त्यामुळे कुणावरही आजतरी संशय नाही, असंही राऊत म्हणाले.

संसदेच्या अधिवेशनात कट शिजतोय, अशा बातम्या ऐकायला येत आहेत. काही खासदारांशी चर्चा झाली आहे. आजही तीन खासदारांशी चर्चा झाली. कोणत्या ना कोणत्या छोट्या मुद्यावर पकडायचं आणि दबाव टाकायचा, हे दुर्दैवी आहे. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेत फुट पाडायची आणि उद्धव ठाकरेंना एकटे पाडण्याचा कुटील डाव आहे. काही जण त्याला दुर्दैवाने बळी पडतात, असं राऊतांनी स्पष्ट केलं.

चारच खासदार ठाकरेंसोबत?

दरम्यान, शिंदे गटातील आमदारांची मुंबईत बैठक सुरू असून या बैठकीला जवळपास 14 खासदार ऑनलाईन सहभागी असल्याचे समजते. गजानन कीर्तिकर, अरविंद सावंत, विनायक राऊत आणि राजन विचारे वगळून इतर सर्व खासदार शिंदे गटात सामील झाल्याची सूत्रांची माहिती त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आमदारांपाठोपाठ खासदारही गेल्यास शिवसेना ताब्यात घेण्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न केले जाऊ शकतात, अशी चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT