K. P. Patil & shivsena Leader
K. P. Patil & shivsena Leader Sarkarnama
देश

Shivsena News : शिवसेना कर्नाटकात ११० जागा लढविणार

सरकारनामा ब्यूरो

खानापूर : बेळगाव जिल्ह्यातील चार जागांसह राज्यातील विधानसभेच्या ११० जागा शिवसेना (Shivsena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लढविणार आहे. त्यामधील खानापूर मतदारसंघासाठी मला उमेदवारी मिळाली आहे. जिल्ह्यातील उर्वरीत तीन जागांसाठी उमेदवारांची चाचपणी सुरु असून येत्या काही दिवसांत उमेदवारही जाहीर केले जातील, अशी माहिती कर्नाटक प्रदेश उपाध्यक्ष के. पी. पाटील यांनी दिली. (Shiv Sena will contest 110 seats in Karnataka)

खानापूर येथील शिवस्मारकात मंगळवारी (ता. ४) आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत के. पी. पाटील बोलत होते. ते म्हणाले, राज्यात शिवसेनेला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कर्नाटक (Karnataka) विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. खानापुरातून ‘मशाल’ चिन्हावर लढण्यासाठी पक्षप्रमुखांनी मला एबी फॉर्म दिला आहे. येत्या १५ तारखेपर्यंत मी उमेदवारी अर्ज भरणार आहे.

सीमाभागात आतापर्यंत शिवसेनेने कधीच निवडणूक लढविली नव्हती. शिवसेना नेहमीच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी उभी राहिलेली आहे. मात्र, आता तशी स्थिती राहिली नाही. तरीही याबाबत वरिष्ठ जो निर्णय देतील, त्याचे पालन आमच्याकडून होईल, असेही पाटील यांनी नमूद केले.

दयानंद चोपडे नामक व्यक्तीचा शिवसेनेशी कोणताही संबंध नाही. त्यांच्याकडे पक्षाचे कोणतेही पद नाही. तालुकाध्यक्ष नारायण राऊत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. पण, त्यांनी एबी फॉर्म दाखविण्यास नकार दिला. या वेळी तालुकाध्यक्ष नारायण राऊत, उपाध्यक्ष प्रकाश पाटील, सोशल मीडिया प्रमुख दत्तात्रय हेगडे, युवा अध्यक्ष मोहन गुरव आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT