मुंबई : धनुष्यबाण पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कारवाईला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नकार दिला आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आता थेट १ नोव्हेंबरला होणार आहे.
मंगळवारी झालेल्या सुनावणीत निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यानंतर आमदारांची अपात्रता, राज्यपालांचा निर्णय या याचिकांवर आता १ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. सत्तासंघर्षावरील सुनावनीला न्यायालयात तारीख पे तारीख सुरुच आहे.
शिंदे गटाच्या अर्जावर न्यायालयाने मंगळवारी सकाळी १०. ३० पासून संपूर्ण दिवस सुनावणी घेतली. यावेळी शिवसेना आणि शिंदे गटाच्या वतीने जोरदार युक्तीवाद झाला. त्यानंतर शिवसेना पक्ष खरा कोणाचा, या प्रश्नावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरु असलेल्या कार्यवाहीला स्थगिती नसेल, असा निर्णय न्यायालयाने दिला.
केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरू असलेल्या कार्यवाहीला स्थगिती द्यावी, अशी विनंती ठाकरे गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. मात्र, तो अर्ज न्यायालयाने फेटाळला. सर्वोच्च न्यायालयातील मुख्य प्रकरण आता थेट 1 महिन्यांनी लांबणीवर गेले आहे. अपात्रतेची याचिका, इतर मुद्द्यांवर घटनापीठासमोर दिवाळीनंतरच सुनावणी होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.