Supreme Court Sarkarnama
देश

Supreme Court : आमदार अपात्रता सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी अजितदादांच्या वकिलांना चांगलंच सुनावलं; न्यायालयात नेमकं काय घडलं?

Shivsena And Ncp Mla Disqualification Case : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गट आणि अजित पवार गटातील आमदारांना अपात्र ठरविलं नाही. त्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दोन वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या होत्या.

Akshay Sabale

शिवसेना आणि राष्ट्रवादी ( Ncp ) आमदार काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी पार पडली. ही सुनावणी दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. यावेळी सरन्यायाधीशांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( अजित पवार ) वकिलांना फटकारलं आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गट आणि अजित पवार गटातील आमदारांना अपात्र ठरविलं नाही. त्या निर्णयाला आव्हान देत शिवसेना ( ठाकरे गट ) आणि राष्ट्रवादीने ( शरदचंद्र पवार ) सर्वोच्च न्यायालयात ( Supreme Court ) दोन वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडली.

शिवसेनेची सर्व कागपदपत्रे पूर्ण असून राष्ट्रवादीची कागदपत्रे दाखल करण्यासाठी वकिलांनी अतिरिक्त वेळ मागितला आहे. त्यामुळे त्यांना अतिरिक्त वेळ देण्यात येत असून सुनावणी दोन आठवड्यांनी पुढे ढकलण्यात आली आहे, असं सरन्यायाधीशांनी म्हटलं. यावेळी सरन्यायाधीशांनी राष्ट्रवादीच्या वकिलांना तुम्ही आम्हाला आदेश देऊ नका, असं म्हणत चांगलंच खडसावलं आहे.

न्यायालयात काय घडलं?

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले, "शिवसेनेची सर्व कागदपत्रे पूर्ण आहेत. राष्ट्रवादीच्या वकिलांनी ( अजितदादा पवार ) कागदपत्रे सादर करण्यासाठी अतिरिक्त वेळ मागितला आहे. त्यामुळे एन. के कौल यांच्या विनंतीनुसार तीन आठवड्यांचा वेळ राष्ट्रवादीला वाढवून दिला आहे. तसेच, दोन आठवड्यांत राष्ट्रवादीच्या मुख्य ( नोडल ) वकिलांनी तयारी पूर्ण करावी. तुमचे मुख्य वकील कोण आहेत?"

त्यावर राष्ट्रवादीच्या वकिलांनी म्हटलं, "अद्याप सूचित नाही."

यानंतर सरन्यायाधीशांनी सांगितलं, "आम्ही दोन मुख्य वकिलांची नावे सुचवली आहेत."

त्यावर राष्ट्रवादीचे वकील म्हणाले, "विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे शुक्रवारपर्यंत मुख्य वकिलांची नियुक्ती करू."

यावर सरन्यायाधीश राष्ट्रवादीच्या वकिलांवर चांगलेच भडकले. "तुम्ही आम्हाला शिकवू नका. पुढील आठड्यातील गुरूवारपर्यंत तुम्हाला वेळ देत आहोत. तसेच, तुम्हाला कोणत्या तारखा हव्या आहेत, हे कोर्ट मास्टरला का सांगत नाही?" असा संतप्त सवाल सरन्यायाधीशांनी अजितदादांच्या वकिलांना केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT