Sanjay Raut challenges PM Modi Sarkarnama
देश

Sanjay Raut : राहुल गांधी खोटे बोलत असतील तर सिद्ध करा! संजय राऊतांचे मोदींना थेट आव्हान

Sanjay Raut challenges PM Narendra Modi over Rahul Gandhi remarks on India economy, asking him prove Gandhi wrong. Raut targets government over inflation, unemployment and farmers distress : राहुल गांधींच्या आर्थिक टीकेवरून राऊतांचा पंतप्रधानांना सल्ला; 'विद्यापीठात जाऊन बोला किंवा राहुल गांधींसोबत चर्चेला बसा'; महागाई, बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्यांवरून सरकारला घेरले, दुसरीकडे देशाचा विकासदर मंदावण्याचा 'इक्रा'चा अंदाज

Pradeep Pendhare

Indian Economy News : देशाच्या अर्थव्यवस्थेवर काँग्रेस तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गंभीर भाकीत वर्तवले आहे. हाच धागा पकडत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोठा सल्ला दिला आहे.

राहुल गांधी यांच्या विधानावर पंतप्रधान मोदी नाराज होतील. तर त्यांनी स्वतः विद्यापीठात जाऊन बोलावे किंवा राहुल गांधी यांच्यासोबत बसून चर्चा करावी, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे.

खासदार संजय (Sanjay Raut) राऊत म्हणाले, "देश सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे आणि त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धोरणे जबाबदार आहेत. देश विकला जात आहे. महागाई वाढत आहे, बेरोजगारीचा आकडा वाढत आहे आणि शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत, शिक्षक आंदोलन करत आहेत आणि महिलाही रस्त्यावर उतरल्या आहेत."

राहुल गांधी यांनी कोलंबिया विद्यापीठात याच मुद्द्यांवर भाष्य केले. कोलंबियासारख्या प्रतिष्ठित विद्यापीठाच्या व्यासपीठावरून बोलणे महत्त्वाचे आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे पंतप्रधान मोदी (Narendra Modi) नाराज असतील, तर त्यांनी स्वतः एखाद्या विद्यापीठात जाऊन बोलावे किंवा राहुल गांधी यांच्यासोबत बसून चर्चा करावी. राहुल गांधी खोटे बोलत आहेत, असे त्यांना वाटत असेल, तर त्यांनी ते सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान खासदार राऊत यांनी पंतप्रधान मोदींना दिले.

दरम्यान, पतमानांकन संस्था 'इक्'राने देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि विकासदरावर मोठे भाष्य केले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासदराचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादनाचा विकासदर 7.5 टक्क्यांवर येईल, असा अंदाज वर्तवला आहे. बाह्य आर्थिक आव्हाने आणि देशातील दुष्काळी परिस्थितीमुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकार 30 नोव्हेंबरला जुलै ते सप्टेंबर या तिमाहीतील जीडीपीची आकडेवारी जाहीर करणार आहे. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने दुसऱ्या तिमाहीसाठी 7.2 टक्के विकासदराचा अंदाज वर्तवला आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या मासिक आर्थिक आढाव्यात विकासदर 7.35 टक्के राहण्याची शक्यता आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत, आव्हाने असताना देखील अर्थव्यवस्थेने दमदार कामगिरी केली आहे. परंतु दुसऱ्या सहामाहीत विकासदाराच वेग मंदावण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT