Smriti Irani  Sarkarnama
देश

किरीट सोमय्यांनंतर आता स्मृती इराणींचा शिवसैनिकांशी सामना अन्...

शिवसैनिकांच्या घोषणाबाजीमुळे अखेर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना काढता पाय घ्यावा लागला.

सरकारनामा ब्युरो

पणजी : भाजपचे (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची पुणे महापालिकेत शिवसैनिकांशी झटापट झाली होती. यावरून भाजप विरुद्ध शिवसेना (Shivsena) असा वाद पेटला आहे. यातच आज केंद्रीय मंत्री व भाजप नेत्या स्मृती इराणी (Smriti Irani) आणि शिवसैनिकांचा सामना झाला. गोवा विमानतळावर शिवसैनिकांच्या घोषणाबाजीमुळे इराणींना काढता पाय घ्यावा लागला.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे आज गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दाखल झाले. ते गोवा विमानतळावर दाखल होण्याआधी केंद्रीय मंत्री व भाजप नेत्या स्मृती इराणी या विमानतळावर दाखल झाल्या. त्यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. आला रे आला कोण आला..शिवसेनेचा वाघ आला, आव्वाज कुणाचा..शिवसेनेचा, अशा घोषणा शिवसैनिक देत होते. त्यावेळी स्मृती इराणी यांच्या स्वागतासाठी फारसे भाजप कार्यकर्ते नव्हते. त्यामुळे आक्रमक शिवसैनिकांना पाहून स्मृती इराणींनी तेथून काढता पाय घेतला. त्या कारमधून बसून तेथून थेट निघू गेल्या.

भाजपने सोमय्या पुणे महापालिकेच्या पायरीवर पडले होते, तिथेच त्यांचा जाहीर सत्कार केला. या वेळी मोठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीही भाजपने सत्कार करण्याची ठाम भूमिका घेतली होती. भाजप कार्यकर्त्यांच्या मोठ्या गर्दीत आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या उपस्थितीत आज सोमय्यांचा पुणे महापालिकेच्या पायऱ्यांवर सत्कार झाला. या वेळी भाजप कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केली. भाजप कार्यकर्त्यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचेही समोर आले आहे.

सोमय्या हे 5 फेब्रवारीला महापालिकेत आले असतानाता शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांसोबत त्यांची बाचाबाची झाली. संतापलेल्या शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांच्या कारच्या काचांवर हाताने ठोसे मारत त्यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली. मात्र आक्रमक शिवसैनिकांशी झालेल्या झटापटीत किरीट सोमय्या अक्षरश: महापालिकेच्या पायऱ्यांवर पडले. किरीट सोमय्याच्या सुरक्षारक्षकांनी शिवसैनिकांना बाजूला करत त्यांना बाहेर काढले. दरम्यान, यावेळी झालेल्या झटापटीमुळे महापालिकेच्या आवारात चांगलाच गोंधळ उडाला होता.

या झटापटीत जखमी झालेल्या सोमय्यांना संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना 6 फेब्रुवारीला रुग्णालयातून सोडण्यात आले. नंतर हाताला बँडेज लावलेल्या अवस्थेत व्हीलचेअरवरून सोमय्या रुग्णालयातून थेट पुणे महापालिकेत पोचले होते. आधीचा प्रकार लक्षात घेता सोमय्यांच्या झेड सुरक्षेसोबत मोठी सुरक्षा तैनात करण्यात आली होती. सोमय्यांनी जम्बो कोविड सेंटर गैरव्यवहाराची तक्रार करुन लगेच ते तिथून निघून गेले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT