shooter dadi chandro tomar dies due to covid infection
shooter dadi chandro tomar dies due to covid infection  
देश

शूटरदादी कोरोनाविरोधातील लढाई अखेर हरल्या...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : प्रसिद्ध नेमबाजपटू चंद्रो तोमर यांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला. त्या 89 वर्षांच्या होत्या. त्यांना शूटरदादी या नावाने ओळखले जाई. त्यांच्या जीवनावरील साँड की आँख हा हिंदी चित्रपट खूप लोकप्रिय ठरला होता. 

चंद्रो तोमर यांच्यावर उत्तर प्रदेशातील मेरठ येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला. तोमर या मूळच्या उत्तर प्रदेशातील बागपत येथील होत्या. त्यांनी वयाच्या 65व्या वर्षापासून नेमबाजी सुरू केली. त्यांनी तीसहून अधिक राष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या होत्या. त्यांची जाऊ प्रकाशी तोमर याही नेमबाजपटू आहेत. त्या जगातील सर्वांत वृद्ध नेमबाज आहेत. 

चंद्रो तोमर यांच्या निधनाबद्दल अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. माझी साथ सुटली, चंद्रो कुठे निघून गेली, असे प्रकाशी तोमर यांनी म्हटले आहे. अभिनेत्री तापसी पन्नू हिने म्हटले आहे की, तुम्ही कायम प्रेरणादायी राहाल. तुम्ही जगण्यासाठी आशा दिलेल्या सर्व मुलींच्या मनात जिवंत राहाल. माझ्या सर्वांत सुंदर रॉकस्टार, तुमच्या आत्म्याला शांती लाभो. 

अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने म्हटले आहे की, चंद्रो दादींच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. माझ्या आयुष्यातील एक भागच आता निघून गेला आहे. त्यांनी स्वत:च नियम आखून त्याप्रमाणे वाटचाल करीत अनेक मुलींना स्वप्ने पूर्ण करण्याची वाट दाखवली. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT