Shraddha Walkar case | 
देश

Shraddha Walkar : पॉलीग्राफ टेस्टमध्ये आफताबला विचारण्यात आले 'हे' प्रश्न

Shraddha Walkar case | आफताबने श्रद्धाची हत्या का आणि कशी केली हे गुढ अद्याप कायम आहे.

सरकारनामा ब्युरो

Shraddha Walkar case| श्रद्धा वालकर हत्येचे प्रकरण समोर आल्यानंतर महाराष्ट्रचं (Maharashtra) नाही तर संपुर्ण देशात खळबळ माजली आहे. या हत्याकांडातील आरोपी आफताबने श्रद्धाची हत्या का आणि कशी केली हे गुढ अद्याप कायम आहे. अशातच श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताबची दिल्ली पोलिसांनी गुरुवारी तब्बल 8 तास पॉलीग्राफी चाचणी केली.

आफताबच्या पॉलीग्राफी चाचणीची दुसरी फेरी दुपारी 12 वाजता सुरू झाली. या चाचणीदरम्यान त्याला सुमारे 40-50 प्रश्न विचारण्यात आले. आफताबचे बालपण, मित्र इथपासून ते श्रद्धाची भेट, डेटींग ते हत्येपर्यंत काय घडले असे अनेक प्रश्न विचारले गेले. आफताबने श्रध्दाच्या हत्येचा कट कसा रचला आणि कशी तिची हत्या केली. हाही प्रश्नही आफताबला विचारण्यात आला. याशिवाय, त्याचं बालपण आणि मित्रांबद्दलही विचारपूस करण्यात आली. असं कोणतं कारण होतं की त्याने श्रद्धाची हत्या केली?, त्याने जाणीवपुर्वक कट रचून तिची हत्या केली की रागाच्या भरात त्याने तिची हत्या केली, असेही त्याला विचारण्यात आले .

याशिवाय त्याची आणि श्रद्धाची भेट कुठे झाली तो श्रद्धाला कधीपासून डेट करू लागला. डेटिंगपासून हत्येपर्यंत काय घडले? त्याने श्रद्धाच्या मृतदेहाची अशा पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा निर्णय का घेतला? एवढेच नाही तर त्याने हत्येसाठी कोणती शस्त्रे वापरली, असेही प्रश्न त्याला विचारण्यात आले. हत्या करुन त्याने शस्त्रे कुठे लपवली आणि शरीराचे अवयव कुठे फेकले. याशिवाय आणखी अनेक प्रश्न विचारण्यात आले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबला आज (२५ नोव्हेंबर) पॉलीग्राफी चाचणीसाठी बोलावले जाऊ शकते. पॉलीग्राफी चाचणी झाल्यानंतर आफताबची वैद्यकीय चाचणी केली जाईल. हा वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच आफताबची नार्को चाचणी केली जाईल.

दरम्यान, गुरुवारी दिल्ली पोलिसांनी आफताबच्या मेहरौलीतील फ्लॅटमधून 5 चाकू जप्त केले आहेत. आफताबने श्रद्धाच्या हत्येनंतर मृतदेह कापण्यासाठीही त्यांचा वापर केल्याचा दिल्ली पोलिसांचा दावा आहे. हे सर्व तपासासाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. जेणेकरुन हे स्पष्ट होईल की त्यांचा उपयोग श्रध्दाचे मृतदेह कापण्यासाठी केला गेला आहे की नाही.

दिल्लीतील मेहरौली येथे फ्लॅट घेतल्यानंतर 18 मे रोजीही दोघांमध्ये भांडण झाले होते. श्रद्धा लग्नासाठी त्याच्यावर दबाव टाकत होती. या मुद्द्यावरून दोघांमध्येही सातत्याने वाद होत होते. अनेकदा तो श्रद्धाला मारहाणही करायचा. पण एक दिवस आफताबने श्रद्धाचा गळा आवळून खून केला. तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून अनेक दिवस फ्रीजमध्ये ठेवले होते. तो रोज रात्री मृतदेहाचा एक एक तुकडा मेहरौलीच्या जंगलात टाकण्यासाठी जात असे. त्याने हे 20 दिवस केले. श्रद्धाच्या हत्येनंतरही तो त्याच फ्लॅटमध्ये राहत होता. तो श्रद्धाचे सोशल मीडिया अकाउंट चालवत होता. यासोबतच त्याने श्रद्धाच्या खात्यातून 54 हजार रुपयेही ट्रान्सफर केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT