Siddaramaiah, Dk Shivkumar News
Siddaramaiah, Dk Shivkumar News Sarkarnama
देश

Karnataka CM oath Ceremony : सिद्धरामय्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री, डीके शिवकुमार यांच्यासह 'या' आठ आमदारांनी घेतली शपथ

सरकारनामा ब्यूरो

Karnataka Cabinet Oath Ceremony : काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांनी कर्नाटच्या मुख्यमंत्री पदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली. तर कर्नाटक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यांच्यासह आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

बेंगळुरू येथील श्री कांतीराव स्टेडियमवर हा शपथविधी सोहळा झाला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge), राहुल गांधी (Rahul Gandhi), प्रियांका गांधी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते या सोहळ्याला उपस्थित होते.

दरम्यान, आज आठ मंत्र्यांनीही शपथ घेतली असून कर्नाटकचे नवे मंत्रिमंडळ आता सज्ज झाले. जी परमेश्वरा, के एच मुनियप्पा, के जे जॉर्ज, एम बी पाटील, सतीश जारकीहोली, प्रियांक खर्गे, रामलिंगा रेड्डी व बी झेड जमीर अहमद खान यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी या मंत्र्यांना शपथ दिली आहे.

मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत काँग्रेसने दिलेले आश्वासन पाळण्यात येणार असल्याची ग्वाही राहुल गांधी यांनी दिली. त्यामुळे आता मंत्रिमंडळ बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शपथविधीपूर्वी काँग्रेस (Congress) नेते सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांनी शुक्रवारी (१९ मे) दिल्लीला जाऊन मंत्रिमंडळाची स्थापना व खातेवाटपा संदर्भात चर्चा केली होती.

दरम्यान, कर्नाटकमध्ये काँग्रेसला ऐतिहासिक विजय मिळला आहे. कर्नाटकच्या २२४ सदस्यांच्या विधानसभेत १३५ आमदारांचे बहुमत मिळालेले आहे. निवणुकीत बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पदावरुन काँग्रेसमध्ये पाच दिवस दिल्लीत खलबते झाली. त्यानंतर सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अनेक तडजोडीनंतर आज कर्नाटकचा शपथ विधी सोहळा पार पडला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT