Siddaramaiah record Sarkarnama
देश

Siddaramaiah record : सिद्धरामय्या नव्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; सेलिब्रेशनसाठी ‘नाटी चिकन डिनर’

Siddaramaiah Set to Become Longest-Serving Karnataka CM : मुख्यमंत्री सिद्धरामय्या सहा जानेवारीला कर्नाटकच्या राजकारणात एक ऐतिहासिक टप्पा गाठणार आहेत.

Pradeep Pendhare

Karnataka Chief Minister : मुख्यमंत्री सिद्धरामय्या सहा जानेवारीला कर्नाटकच्या राजकारणात एक ऐतिहासिक टप्पा गाठणार आहेत. राज्यात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले मागासवर्गीय नेते डी. देवराज अर्स यांच्या विक्रमाशी बरोबरी करत एक नवा अध्याय लिहिणार आहेत.

डी. देवराज अर्स यांनी सुमारे 2792 दिवस म्हणजेच जवळपास 7.6 वर्षे मुख्यमंत्रिपद भूषवले होते. सिद्धरामय्या आता हा विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर आहेत.

या विशेष प्रसंगाचे वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेशन करण्यासाठी सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांच्या समर्थकांकडून ‘देशी कोंबडी डिनर’चे (नाटी चिकन डिनर) आयोजन केले आहे. सहा जानेवारीला नेलमंगला इथल्या भक्त निवासस्थानी देशी कोंबडी डिनर होणार असून पाच ते दहा हजार समर्थक सहभागी होण्याची शक्यता आहे. या मेजवानीत ‘नाटी कोळी सांबर’, रागी मुद्दे, काळू गोज्जू, भात, पुलाव आणि मिठाई असा पारंपरिक मेनू आहे.

एका वर्षापूर्वीच सिद्धरामय्या यांनी सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता ती इच्छा प्रत्यक्षात साकार होत आहे. काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या महत्त्वाकांक्षेमुळे निर्माण झालेल्या पक्षांतर्गत अडथळ्यांचा सामना करत सिद्धरामय्या या टप्प्यापर्यंत पोहोचले आहेत.

दरम्यान, राज्यात नेतृत्व संकट निर्माण झाले असताना काँग्रेस हायकमांडच्या सूचनेनुसार सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात ‘नाश्ता डिप्लोमसी’ बैठक झाली होती. प्रथम सिद्धरामय्या यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. त्यानंतर सिद्धरामय्या यांना शिवकुमार यांनी आपल्या निवासस्थानी आमंत्रित केले. सिद्धरामय्यांच्या स्वागतासाठी ‘देशी चिकन सांबार’ आणि इडली, असा मेनू होता. सिद्धरामय्या यांनी सांगितल्याप्रमाणे खास देशी कोंबडी आणून म्हैसूर शैलीतील सांबार बनवले होते.

‘अहिंद’ परंपरेतील नेता

देवराज अर्स यांनी स्वतः घडवलेली ‘अहिंद’ (अल्पसंख्याक, मागासवर्गीय आणि दलित) ही राजकीय संकल्पना आजही कर्नाटकच्या राजकारणावर प्रभाव टाकत आहे. त्याच परंपरेतील नेता म्हणून सिद्धरामय्या यांचा हा विक्रम सामाजिक-राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT