Sandhya Mukherjee sarkarnama
देश

भट्टाचार्य यांच्यानंतर संध्या मुखर्जींनीही 'पद्मभूषण' नाकारला

कला, साहित्य, संशोधन, राजकारण, सामाजिक कार्य यासह विविध क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात येतो.

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्काराने केलं जाणार असून, यात पश्चिम बंगालचे (West Bengal) माजी मुख्यमंत्री तथा कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांनाही पद्म भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कारांची घोषणा करण्यात आल्यानंतर बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे.

भट्टाचार्य यांच्याबरोबर बंगालमधील प्रसिद्ध गायिका संध्या मुखर्जी (Sandhya Mukherjee) यांनीही पद्म पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. मंगळवारी दुपारी केंद्राच्या अधिकाऱ्यांनी मुखर्जी यांना पुरस्काराबद्दलची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पुरस्कार घेण्यास नकार दिला. ''पद्मश्री पुरस्कार हा माझ्यासारख्या ज्येष्ठ गायिकेला देण्यासारखा नाही. त्यामुळे हा पुरस्कार स्वीकारणं म्हणजे अपमानासमान आहे,'' असं गायिकेच्या निकटवर्तीयांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

संध्या मुखर्जी दक्षिण कोलकाता भागातील लेक गार्डन परिसरात राहतात. त्यांनी बंगाली चित्रपटांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. कला, साहित्य, संशोधन, राजकारण, सामाजिक कार्य यासह विविध क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात येतो.

‘पद्म भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल मला कोणतीही कल्पना नाही. मला याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. जर मला पुरस्कार देण्यात आला असेल, तर मी तो घेण्यास माझा नकार आहे’, असं भट्टाचार्य म्हटलं आहे.

यंदा महाराष्ट्रातील आठ दिग्गजांचा पद्म पुरस्कारांने सन्मान केला जाणार आहे. यामध्ये एक पद्म विभूषण दोन पद्म भूषण आणि पाच पद्मश्री पुरस्कार आहेत.

प्रभा अत्रे – पद्मविभूषण

नटराजन चंद्रशेखरन – पद्मभूषण

सायरस पूनावाला – पद्मभूषण

डॉ. हिंमतराव बावस्कर – पद्म

सुलोचना चव्हाण – पद्म

डॉ. विजयकुमार विनायक डोंगरे – पद्म

सोनू निगम – पद्म

अनिल कुमार राजवंशी – पद्म

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT