Sidhu Moose Wala
Sidhu Moose Wala  Sarkarnama
देश

धक्कादायक! सिद्धू मूसेवालाच्या शरीरावर 24 गोळ्यांच्या जखमा अन् कवटीत आढळली एक गोळी

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंजाबमधील (Punjab) काँग्रेसचा (Congress) नेता व प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala) याची हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणामुळं राज्यभरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. सिद्धूचं शवविच्छेदन पाच डॉक्टरांनी केलं आहे. या शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. त्याच्या शरीरावर तब्बल 24 गोळ्यांच्या जखमा आढळल्या आहेत. याचबरोबर त्याच्या कवटीतही एक गोळी आढळली आहे. (Sidhu Moose Wala News Updates)

सिद्धूच्या शवविच्छेदन अहवालात त्याचा मृत्यू अतिरक्तस्रावामुळं झाल्याचं म्हटलं आहे. त्याच्या शरीरावर गोळ्यांच्या 24 जखमी आहेत. शरीरात गोळ्या घुसून बाहेर पडल्याचंही निदर्शनास आलं आहे. त्याच्या शरीरातील अनेक अवयवांवरही गोळ्यांच्या जखमा आढळून आल्या आहेत. याचवेळी त्याच्या कवटीत एक गोळी आढळली आहे. त्याचा व्हिसेरा पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धू मूसेवाला हा त्याच्या गाडीतून जात असताना दोन गाड्यातून हल्लेखोर त्याचा पाठलाग करीत होते. जवाहरके गावात त्यांनी सिद्धूच्या गाडीवर गोळीबर केला. यात तो जागीच ठार झाला. दोन गुन्हेगारी टोळ्यांतील अंतर्गत संघर्षातून हा प्रकार झाल्याचा संशय आहे. हल्लेखोरांनी रशियन बनावटीच्या एएन-94 रायफलींचा वापर केला. सिद्धू याच्यावर 30 गोळ्या झाडण्यात आल्या. त्या किमान तीन रायफलींमधून झाडण्यात आल्या. हल्लेखोरांनी नंतर त्याचा मृत्यू झाल्याची खातरजमा करूनच तेथून पलायन केलं. सिद्धूबरोबर असलेले दोन जण जखमी असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

सिद्धू मूसेवाला हा लोकप्रिय असण्यासोबत वादग्रस्तही होता. विधानसभा निवडणुकीआधी त्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याला पक्षात आणण्यामागे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांचा हात होता. गायक सिद्धू हा 28 वर्षांचा होता आणि त्याच्या गँगस्टर रॅपचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. त्याच्यावर अनके गुन्हे दाखल होते. गाण्यातून बंदुकीचा वापर आणि हिंसाचाराला खतपाणी घातल्याबद्दल त्याच्यावर हे गुन्हे दाखल होते. त्याचे मूळगाव मानसामध्ये असून, त्याच मतदारसंघातून तो निवडणूक लढला होता. त्याचा आम आदमी पक्षाचे उमेदवार विजय सिंगला यांनी पराभव केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT