मुंबई : मुख्य सचिवपदी मुदत वाढ देण्यास सीताराम कुंटे (sitaram kunte) यांना केंद्र सरकारनं नकार दिला. त्यानंतर कुंटे निवृत्त झाले, अन् निवृत्तीनंतर दहा मिनिटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कुंटेंना सुखद धक्का दिला.
मुख्यमंत्र्यांनी कुंटे यांची मुख्य सल्लागारपदी नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्र्यांशी कुंटे यांचे जुळलेले ट्यूनिंग अन् कोविडकाळात त्यांनी बजावलेली भूमिका याचे बक्षिस म्हणून मुख्यमंत्र्यांनी अजोय मेहता यांच्यानंतर कुंटे यांना मुख्य सल्लागार बनवले असल्याची चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये रंगली आहे.
नऊ महिन्यानंतर अजोय मेहता यांच्या जागी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सल्लागारपदी कुंटे यांची नियुक्ती केली आहे. कुंटे यांनी केंद्रीय चौकशी यंत्रणाना महत्व न दिल्याने त्यांचा मुदतवाढीचा अर्ज फेटाळण्यात आल्याची चर्चा वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांमध्ये आहे.
मंगळवारी (ता.३०) सांयकाळी सहा वाजता सीताराम कुंटे मुख्य सचिवपदावरुन निवृत्त झाले. त्यानंतर दहा मिनिटांतच मुख्यंमंत्र्यांनी त्यांनी नेमणूक ही मुख्य सल्लागार म्हणून केली. सनदी अधिकारी म्हणून ३६ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या कुंटेचा प्रवास हा मुंबई महापलिकेत सहआयुक्त, अतिरिक्त आयुक्त,पालिका आयुक्त, गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ते राज्याचे मुख्य सचिव, मुख्य सल्लागार असा आहे.
मुख्यमंत्र्याचे माजी सल्लागार अजोय मेहता यांची महारेराच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर मुख्यमंत्र्याचे सल्लागार पद रिक्त होते. नऊ महिन्यानंतर अजोय मेहता यांच्या जागी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सल्लागारपदी कुंटे यांची नियुक्ती केली.
सीबीआयने राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्लीत चौकशीसाठी बोलविले होते. या चौकशीला ते गेले तर नाहीच उलट महाराष्ट्राने सीबीआयचे संचालक सुबोध जयस्वाल यांची चौकशी सुरू केली. जयस्वाल हे राज्याच महासंचालक असताना झालेल्या बदल्यांची चौकशी महाराष्ट्रात सुरू झाल्याने केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष उघडपणे सुरू झाला. त्यामुळेच ठाकरे यांनी शिफारस केलेल्या नावाला मुदतवाढ मिळू शकली नाही, असे बोलले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.