Congress File Photo
देश

सर्वात श्रीमंत काँग्रेस आमदाराला मंत्री करण्यास विरोध

विस्ताराच्या यादीला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हिरवा कंदील दाखवला आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंजाबच्या (Punjab) मुख्यमंत्रिपदाची (Chief Minister) धुरा चरणजितसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी हाती घेतल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज (ता.26) होणार आहे. पण या विस्ताराच्या काही तास आधीच काँग्रेसला धक्का बसला आहे. प्रस्तावित विस्ताराच्या यादीत नाव असलेल्या सर्वात श्रीमंत आमदाराला मंत्री करण्यास सहा आमदारांनीच विरोध केला आहे. या आमदारांनी थेट प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू यांना पत्र लिहिलं आहे.

विस्ताराच्या यादीला काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांच्या समर्थकांसह 5 जणांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाणार असून, 7 नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची आरोग्यमंत्री बलबीर सिद्धू, वनमंत्री साधूसिंग धरमसोत, क्रीडा मंत्री राणा यांच्यासह गुरमित सोधी, एस.एस.अरोरा, गुरप्रित कांगड यांना वगळले जाण्याची शक्यता आहे.

याचवेळी राजकुमारे वेरका, कुलजित नागरा, गुरकिरतसिंग कोटली, परगतसिंग, राजा वारिंग, राणा गुरजितसिंग आणि सुरजितसिंग धिमान यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची चर्चा आहे, असे सूत्रांनी सांगितले. पण यातील राणा गुरजितसिंग यांच्या नावावर सहा आमदारांनी आक्षेप घेतला आहे. राज्यातील सर्वात श्रीमंत आमदारांपैकी एक असलेल्या गुरजितसिंग यांना जानेवारी 2018 मध्ये माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्या मंत्रिमंडळातून हटवण्यात आलं होतं.

माती खणन घोटाळ्यामध्ये गुरजितसिंग यांच्या परिवारातील सदस्यांची नावे आहेत. या घोटाळ्यामुळं राज्याला 25 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याऐवजी एका दलित आमदाराला मंत्री करावे, अशी मागणी सहा आमदारांनी सिध्दू यांच्याकडं केली आहे. पंजाबमधील दोआबा क्षेत्रातील प्रस्तावित कॅबिनेट नावं जाट शीख आणि ओबीसी शीख आहेत. पण या भागात 40 टक्के दलित लोक आहेत, त्यामुळे या भागातील दलित आमदाराला मंत्री करावे, असं त्यांचं म्हणणं आहे.

मंत्रिमंडळ विस्तार दुपारी साडे चार वाजता होणार आहे. काही तास बाकी असतानाच आमदारांनीच प्रस्तावित नावावर आक्षेप घेतल्यानं काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. अमरिंदरसिंग यांच्याकडून होत असलेल्या टीकेमुळे आधीच काँग्रेस घायाळ झाली आहे. त्यात आता मंत्रिमंडळ विस्तारावरही आमदारांकडून विरोध होऊ लागल्याने निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला सर्व आमदारांना एकसंध ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT