K Chandrashekar Rao Sarkarnama
देश

K Chandrashekar Rao News : केसीआर यांच्याविरोधात कोर्टात गेलेल्या कार्यकर्त्याची हत्या; तेलंगणात खळबळ

Telangana Ex CM Corruption News N Rajlingamurthy death : एन राजलिंगमूर्ती यांनी केसीआर यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार केली होती.

Rajanand More

Telangana Politics : तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि अन्य काही जणांवर भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. बुधवारी रात्री त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हत्या कुणी केली, यामागे कुणाचा हात होता, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

तेलंगणातील कालेश्वरम योजनेअंतर्गत मेदिड्डा धरणाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राजलिंगमूर्ती यांनी केला होता. त्यानंतर याबाबत तक्रारही दाखल केली होती. त्यामध्ये केसीआर यांच्यासह माजी मंत्री आणि अनेक ठेकेदारांचा तक्रारीत समावेश होता. त्यांनी ऑक्टोबर 2023 मध्ये कोर्टात खाजगी तक्रार दाखल केली होती. त्याअंतर्गत त्यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

केसीआर, त्यांचे भाचे आणि माजी मंत्री टी. हरीश राव यांनी नंतर तेलंगणा हायकोर्टात याचिका दाखल केल होती. मागील वर्षी डिसेंबर महिन्यांत हायकोर्टाने जिल्हा न्यायालयाने दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली होती. आज पुन्हा जिल्हा न्यायालयात राजलिंगमूर्ती यांच्या याचिकेवर सुनावणी होती.

याचिकेवर सुनावणीच्या आदल्यादिवशीच त्यांची हत्या करण्यात आल्याने तेलंगणात खळबळ उडाली आहे. त्यांच्या हत्येमागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. जमिनीच्या वादातून त्यांची हत्या झाल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. दोन अज्ञातांनी त्यांच्यावर चाकू हल्ला केल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.

राजलिंगमूर्ती हे बुधवारी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर जवळपासच्या लोकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात हलवले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, हत्येच्या घटनेनंतर काँग्रेस नेते आक्रमक झाले असून याप्रकरणी केसीआर यांची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT