Anil Awachat Passes Away  Sarkarnama
देश

Anil Awachat : जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचे निधन

Anil Awachat : मुक्तांगणचे निर्माते आणि हजारो तरुणांना व्यसनमुक्त करणारे डॉ. अनिल अवचट काळाच्या पडद्याआड

सरकारनामा ब्युरो

पुणे : महाराष्ट्रातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट (Anil Awachat) यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले. (prominent Marathi author and social activist dr anil awachat passed away)आज सकाळी ९ वाजून १५ मिनीटांनी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. अनिल अवचट हे सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि प्रतिथयश लेखक म्हणून महाराष्ट्राला परिचित होते. यासोबत त्यांनी त्यांच्या दिवंगत पत्नी डॉ. अनिता अवचट आणि दिवंगत पु. ल. देशपांडे यांच्यासमवेत १९८६ साली पुण्यात मुक्तांगण (Muktangan Pune) व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली होती. (Anil Awachat Passes Away)

डॉ. अनिल अवचट यांच्यावर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे डॉक्टरांनी कुटुंबियांना त्यांना घरी नेण्याचा सल्ला दिला होता. आज सकाळी त्यांची प्रकृती आणखी अत्यावस्थ झाली आणि ते कोमामध्ये गेले. अखेरीस सकाळी ९ वाजून १५ मिनीटांनी पुण्यातील गोखलेनगर भागातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी २ च्या सुमारास त्यांच्यावर अत्यंसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात त्यांच्या विवाहित मुली मुक्ता आणि यशोदा, अन्य कुटुंबीय, आणि मोठा मित्रपरिवार आहे. (Anil Awachat News)

पुण्यात मुक्तांगणची स्थापना करून त्यांनी व्यसनमुक्तीसाठी मोठ्या प्रमाणावर कार्य केले. यामाध्यमातुन आजपर्यंत हजारो तरुणांना व्यसनाच्या वाटेवरुन परत मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. महाराष्ट्र फाऊंडेशचा पुरस्कार ही त्यांना मिळाला आहे. याशिवाय पत्रकारितेमध्ये देखील मोठे नाव मिळवले होते. रिपोर्टिंगचे दिवस, स्वतःविषयी, पौर्णिमा, अमेरिका यासह त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. रिपोर्ताज हा लेखनचा प्रकार त्यांनी मराठीत लोकप्रिय केला. त्यांनी मुलांसाठी ही लेखन केले आहे.

डॉ. अवचट यांच्या निधनाची दुःखद बातमी सांगताना डॉ. अवचट यांचे स्नेही आणि मुक्तांगणचे अध्यक्ष डॉ. आनंद नाडकर्णी म्हणाले, अनिल उर्फ आमच्या सगळ्यांचा बाबा आमच्यातून निघून गेला आहे. त्याला झालेल्या आजारातुन तो परत येणे शक्य नाही याची आम्हाला कल्पना होती. मात्र आम्ही आमचे प्रयत्न सुरु ठेवले होते. मात्र आज त्याचे निधन झाले. एक गोष्ट म्हणजे अनिलचे त्याच्या माणसांत, त्याच्या आवडत्या गोष्टींसमवेत अतिशय शांतपणे निधन झाले, याचं काहीसं समाधान आहे. यावेळी बोलताना डॉ. अनिता आणि अनिल अवचट यांच्या व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातील कार्याचा वसा यापुढे देखील असाच चालू राहिल असाही विश्वास डॉ. आनंद नाडकर्णी यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT