Sonam Wangchuk ended his 26-day hunger strike after discussions with the government in the presence of J.P. Nadda. Sarkarnama
देश

Sonam Wangchuk Hunger Strike : मध्यरात्रीत मोठ्या घडामोडी! सोनम वांगचुक यांनी उपोषण घेतले मागे; सरकारकडून अटी मान्य?

Sonam Wangchuk End Hunger Strike : सोनम वांगचुक यांनी तब्बल 26 दिवसानंतर आपले उपोषण सोडले आहे. मंत्री जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत त्यांनी रुग्णालयात आपले उपोषण मागे घेतले.

Jagdish Patil

Sonam Wangchuk News : नीट पेपर फुटीनंतर शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांनी मध्यरात्री आपले सफदगंज रुग्णालयात आपले उपोषण मागे घेतले. केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा आणि लेह लडाखच्या एपेक्स बॉडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी उपोषण मागे घेतले.

सोनम वांगचुक यांनी ट्विट करत उपोषण मागे घेत असल्याची माहिती दिली. मी अखेर 26 दिवसांनंतर माझे उपोषण सोडले.यापूर्वी विविध राजकीय पक्षांतील 65 खासदारांनी प्रत्यक्ष भेट देऊन किंवा पत्रांद्वारे मला उपोषण सोडण्याची विनंती केली होती, असे त्यांनी सांगितले.

'विविध अटींवर दीर्घ चर्चेनंतर आणि देशात हिंसाचार होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. या अटींबाबत सविस्तर माहिती मी लवकरच एका स्वतंत्र व्हिडिओद्वारे देणार आहे.', असे देखील त्यांनी म्हटले आहे.

हिंसाचार होऊ देऊ नका

सोनम वांगचुक यांनी आवाहन करत म्हटले आहे की, मी सरकारसमोर ठेवलेल्या अटींची सविस्तर माहिती देणार आहे. माझी सर्वांना विनंती आहे की, देशात कुठेही कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होऊ देऊ नका आणि त्याबाबत अत्यंत सतर्क राहा.

रुग्णालयात उपचार सुरू

सोनम वांगचुक यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपोषणाच्या 21 दिवशी त्यांना जंतर मंतर येथून जबरदस्तीने ताब्यात घेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांनी रुग्णालया देखील आपले उपोषण सुरू ठेवले होते. अखेर 26 व्या दिवशी त्यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT