Sonia Gandhi Belonging autobiography first look Sarkarnama
देश

Sonia Gandhi : सोनिया गांधींची इन्स्टाग्रामवर एन्ट्री! पहिल्याच पोस्टमध्ये शेअर केला ‘Belonging’ आत्मचरित्राचा फर्स्ट लूक व्हॉयरल! पाहा video!

Sonia Gandhi Belonging autobiography first look : सोनिया गांधी यांनी इन्स्टाग्रामवर एन्ट्री करत पहिल्याच पोस्टमध्ये ‘Belonging’ आत्मचरित्राचा फर्स्ट लूक शेअर केला. जाणून घ्या या पोस्टविषयी महत्त्वाचे तपशील.

Rashmi Mane

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी अखेर इन्स्टाग्रामवर त्यांचे अकाऊंट बनवत सोशल मीडियावर पदार्पण केले आहे. त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरील पहिल्याच पोस्टमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सोनिया गांधी यांनी आपल्या आगामी पुस्तकाची पहिली झलक शेअर केली असून, ‘Belonging: A Journey of Love’ या पुस्तकाच्या नावाने अनेकांचे लक्ष वेधले आहे.

सोनिया गांधी यांच्या पहिल्या पोस्टमध्ये त्यांच्या आगामी पुस्तकाची माहिती देण्यात आली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी वाचकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या इन्स्टाग्रामवरील आगमनानंतर फॉलोअर्सची संख्या वेगाने वाढू लागल्याचे वृत्त आहे. त्यामुळे त्यांच्या सोशल मीडिया पदार्पणाची राजकीय आणि साहित्यिक वर्तुळात चर्चा होत आहे.

सोनिया गांधी यांनी पुस्तकाबाबतच्या पोस्टमध्ये लिहिले, सर्वांना नमस्कार, हा क्षण तुमच्या सर्वांसोबत शेअर करताना मला अत्यंत कृतज्ञ वाटत आहे. 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह'ची पहिली झलक - ही प्रेम, कर्तव्य, नुकसान आणि स्वतःचे स्थान शोधण्याची कथा आहे. मी हे तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी खूप उत्सुक आहे.

सोनिया गांधी यांच्या नव्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील आणखी एक बाब चर्चेत आहे. त्यांनी या अकाउंटवरून केवळ 3 अकाउंट्सना फॉलो केल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा आणि काँग्रेस पक्षाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटचा समावेश आहे.

‘Belonging: A Journey of Love’ हे सोनिया गांधी यांचे आगामी आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे. HarperCollins या प्रकाशन संस्थेकडून हे पुस्तक प्रकाशित होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. हे पुस्तक 10 नोव्हेंबर 2026 रोजी बाजारात येणार असल्याचे वृत्त आहे.

या पुस्तकात सोनिया गांधी यांच्या बालपणापासून ते भारताच्या राजकारणातील त्यांच्या प्रवासापर्यंतच्या अनेक महत्त्वाच्या टप्प्यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. राजीव गांधी यांच्याशी झालेली भेट, विवाह, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्येनंतर राजकारणात आलेली त्यांची भूमिका अशा त्यांच्या आयुष्यातील अनेक घटनांवर या पुस्तकातून प्रकाश पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT