sourav ganguly
sourav ganguly sarkarnama
देश

Sourav Ganguly : सौरव गांगुली खेळणार नवी इनिंग ; राजकारणात प्रवेश ?

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : क्रिकेटपटू सौरव गांगुली (Sourav Ganguli) क्रिकेटमधील 30 वर्षे पूर्ण केल्यानंतर नवी इनिंग सुरु करणार आहे, याबाबत सौरभ गांगुलीने टि्वट केलं आहे. या टि्वटची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष (BCCI president) सौरव गांगुली (Sourav Ganguli) बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार का अशा चर्चा रंगल्या आहेत. (Sourav Ganguly latest news)

"मी १९९२ पासून क्रिकेटर म्हणून माझी कारकीर्द सुरू केली होती. २०२२ मध्ये या गोष्टीला ३० वर्षे होत आहेत. या संपूर्ण काळात मला क्रिकेटने खूप काही दिले. सर्वात महत्त्वाचं होतं ते म्हणजे लोकांकडून मिळालेलं प्रेम आणि पाठिंबा. आज मी ज्या स्थानावर आहे तो माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि मला पाठिंबा देणाऱ्या लोकांमुळेच. मी आज त्या सगळ्यांचे आभार मानू इच्छितो. तसंच मी आता एक नवा अध्याय सुरू करतो आहे ज्याद्वारे मी लोकांना मोठ्या प्रमाणात मदत करू शकेन. मला आशा आहे की लोक मला असाच पाठिंबा देतील." असे टि्वट सौरभ गांगुली यांनी केलं आहे.

गेल्या महिन्यात भाजपचे नेते, गृहमंत्री अमित शाह पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी सौरव गांगुलीच्या घरी अमित शाह यांनी जेवण केलं होते. त्यानंतर घडलेली ही घडामोड महत्त्वाची ठरली आहे. सौरव गांगुली आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

सौरभ गांगुलीच्या या ट्विटची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. त्याचप्रमाणे तो राजीनामा देणार असल्याचीही चर्चा चांगलीच रंगली आहे. मात्र, सौरव गांगुलीने राजीनामा दिलेला नाही, असं बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितलं आहे. जय शाह हे 'एएनआय' ही बोलत होते.

सौरव गांगुलीची कारकिर्द

  • सौरव गांगुलीने 1992 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

  • यानंतर त्याने 1996 मध्ये कसोटी पदार्पण केले आणि 2003 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व केले.

  • या स्पर्धेत गांगुलीने भारताला उपविजेतेपद मिळवून दिले.

  • या माजी कर्णधाराने आपल्या कारकिर्दीत एकूण 113 कसोटी आणि 311 एकदिवसीय सामने खेळले.

  • कसोटी क्रिकेटमध्ये 7212 धावा केल्या आणि यात 16 शतकांचा समावेश आहे.

  • एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 11,363 धावा केल्या, त्यात 22 शतकांचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT