South Korea Plane Crash Video : कझाकिस्थानमध्ये नुकतंच काही दिवसांपूर्वी झालेली विमान दुर्घटना ताजी असतानाच दक्षिण कोरियामध्ये (South Korea) मोठी विमान दुर्घटना झाली आहे. लँडिंगवेळी विमानतळावरच विमान क्रॅश झालं आहे.
या विमानात 181 प्रवाशी होते. या प्रवाशांना घेऊन जात असताना या विमानाला अचानक आग लागल्यामुळे ते कोसळले आणि ही दुर्घटना घडली. तर या अपघातात (Accident) 28 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
दक्षिण कोरियामधील मुआन विमानतळावर रविवारी (ता.29) हे विमान कोसळले. या अपघातात आतापर्यंत 28 जणांचा मृत्यू झाला असून मृताची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विमान लँडिंग करताना अचानक ब्लास्ट झाला, त्याचा आवाज इकता मोठा होता की त्यामुळे त्या आवाजामुळे विमानतळाच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, जेजू एअरचे विमान थायलंडबून परत येत असताना मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करताना धावपट्टीवरून घसरले. विमान घसरल्याने ब्लॅास्ट झाला आणि आग लागल्यामुळे मोठी दुर्घटना घडली.
तर या आतापर्यंत दुर्घटनाग्रस्त विमानातून 28 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर या अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल हो आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.