Azam Khan Sarkarnama
देश

खासदारकीचा राजीनामा दिला अन् आता आमदारकीचीही शपथ नाही!

समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना मात्र शपथ घेता येणार नाही. आझम खान हे मानहानीसह विविध गुन्ह्याअंतर्गत अडीच वर्शांपासून तुरूंगात आहेत.

सरकारनामा ब्युरो

लखनौ : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीनंतर योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी नुकतीच मुख्यममंत्रिपदाची सलग दुसऱ्यांदा शपथ घेतली. तर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी खासदारकीचा राजीनामा विरोधी पक्षनेतेपद स्वीकारले आहे. सोमवारी या दोन नेत्यांसह बहुतेकांनी विधानसभेत आमदारकीची शपथ घेतली.

समाजवादी पक्षाचे नेते आझम खान (Azam Khan) यांना मात्र शपथ घेता येणार नाही. आझम खान हे मानहानीसह विविध गुन्ह्याअंतर्गत अडीच वर्षांपासून तुरूंगात आहेत. त्यांनी तुरूंगातूनच रामपूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने निवडूनही आले. पण त्यांना आमदारकीची शपथ घेता येणार नाही. न्यायालयाने त्यांना आमदार पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेण्यासाठी विधानसभेत जाण्यास परवानगी नाकारली आहे. त्यांना शपथ घेण्यासाठी जामीन दिला जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. दरम्यान, खान यांनीच आज शपथ घेण्यासाठी जाण्यास नकार दिल्याचे समजते.

खान हे मागील अडीच वर्षांपासून सीतापूर तुरूंगात आहेत. शपथ ग्रहण करण्याबाबत विधानसभा प्रशासनाने तुरूंग प्रशासनाला पत्र पाठवले होते. पण त्यावर आझम खान यांच्याकडून उत्तर देण्यात आलं नाही. याबाबत तुरूंग प्रशासनानेही न्यायालयात सांगितलं. न्यायालयाने त्यांना विधानसभेत नेण्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे त्यांना आताच शपथ घेता येणार नाही. खान यांनी नुकताच खासदारकीचा राजीनामा दिला आहे.

योगी अन् अखिलेश यांनी मिळवले हात

यूपीमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजप (BJP) व मित्रपक्षांनी मिळून 273 जागांवर विजय मिळवला. याचवेळी समाजवादी पक्षाच्या आघाडीला 125 जागा मिळाल्या आहेत. अखिलेश यादव यांनी आमदारकीसाठी खासदारकीवर पाणी सोडले आहे. अखिलेश यांनी आता दिल्लीऐवजी उत्तर प्रदेशवर लक्ष्य केंद्रित केले आहे. तर योगींनी नुकतीच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत कामालाही सुरूवात केली. (UP Election 2022)

निवडणूक प्रचारादरम्यान दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर सडकून टीका केली आहे. त्यामुळे विधानसभेत दोघांमध्यो जोरदार आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. योगी सरकारला अडचणीत आणण्याची एकही संधी न सोडण्याचे धोरण समाजवादी पक्षाचे आहे. पण त्यापूर्वी सोमवारी दोघेही नेते आमनेसामने आले. विधानसभेत या दोघांसह इतर आमदारांना शपथ देण्यात आली.

त्यापूर्वी योगी आणि अखिलेश यांनी एकमेकांच्या हातात हात मिळवला. यावेळी योगींनी अखिलेश यांच्या पाठीवर थापही मारली. या दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. दोघेही पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले आहेत. योगी हे गोऱखपूर मतदारसंघाचे खासदार होते. त्यानंतर त्यांनी 2017 मध्ये मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर खासदारकीचा राजीनामा दिला होता. तर अखिलेश यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत करहल मतदारसंघातून विजय मिळाल्याने खासदारकीचा राजीनामा दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT