Arun Goel, Rajiv Kumar Sarkarnama
देश

Arun Goel News : निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी का दिला राजीनामा? राजीव कुमार पडले एकटे...

Election Commission : गोयल यांच्या राजीनाम्यामुळे राजीव कुमार यांच्यावर आता निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी आली आहे. निवडणूक आयुक्तांची सर्व पदे रिक्त आहेत.

Rajanand More

New Delhi News : देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना काल अचानक निवडणूक आयुक्त अरुण गोयल (Arun Goel News) यांनी राजीनामा दिला. काही दिवसांतच निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील. त्याआधीच गोयल यांनी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. पण त्यांनी अचानक राजीनामा का दिला, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

गोयल यांनी राजीनामा देताना वैयक्तिक कारण दिल्याची चर्चा आहे. सरकारने त्यांना राजीनामा देण्यापासून रोखल्याचेही सांगितले जात आहे. पण गोयल यांनी माघार घेतली नाही. त्यांच्या तब्बेतीचे कारणही पुढे आले होते. पण निवडणूक आयोगातील (Election Commission) अधिकाऱ्यांनी गोयल यांची तब्बल ठणठणीत असल्याचा दावा केल्याचे वृत्त ‘एनडीटीव्ही’ने दिले आहे.

गोयल आणि मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) यांच्यामध्येच मतभेद असल्याचे ‘एनडीटीव्ही’ने आयोगातील सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्ता म्हटले आहे. त्यामुळे आता नेमका हा वाद काय होता, यावरूनही तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

दरम्यान, गोयल यांच्या राजीनाम्यामुळे आता राजीव कुमार एकटे पडले आहेत. निवडणूक आयुक्तांची (Election Commissioner) दोन्ही पदे रिक्त झाली आहे. पुढील आठवड्यात लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजीव कुमार यांच्यावरच संपूर्ण भार पडणार आहे. निवडणुकीच्या (Election) तयारीचा आढावा घेण्यासाठी राज्यांच्या दौऱ्यावर राजीव कुमार यांच्यासोबत गोयल असायचे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, गोयल यांच्या राजीनाम्यांनंतर विरोधी पक्षांनी मोदी सरकावर (Modi Government) जोरदार टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी म्हटले आहे की, पुढील काही दिवसांत निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील. आता केवळ एकच निवडणूक आयुक्त आहेत. असे का? मी आधी म्हटल्याप्रमाणे, जर आपण आपल्या स्वतंत्र संस्थांचा पद्धतशीरपणे होणारा नाश थांबवला नाही, तर आपली लोकशाही हुकूमशाहीने बळकावली जाईल.

कोण आहेत अरुण गोयल?

निवडणूक आयुक्तपदाचा राजीनामा दिलेले अरुण गोयल हे पंजाब केडरचे माजी IAS अधिकारी आहेत. त्यांनी 21 नोव्हेंबर 2022 रोजी निवडणूक आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यांचा कार्यकाळ 2027 मध्ये संपणार होता. यापूर्वी गोयल यांनी अवजड उद्योग मंत्रालयात सचिव म्हणून काम केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT