Sri Lanka Parliament, Sri Lanka political crisis News Sarkarnama
देश

मंत्रिमंडळाच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रपतींचं मोठं पाऊल; सर्वपक्षीय सरकार स्थापनेचा 'प्लॅन'

आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेत पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी एक एप्रिल रोजी देशात आणीबाणी जाहीर केली.

सरकारनामा ब्युरो

कोलंबो : श्रीलंकेत (Sri Lanka) मोठा राजकीय भूकंप झाला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेत पंतप्रधान महिंदा राजपक्षे (Mahinda Rajapaksa) यांनी एक एप्रिल रोजी देशात आणीबाणी जाहीर केली. त्यानंतर रविवारी त्यांच्या मंत्रिमंडळातील (Cabinet) सर्व मंत्र्यांनी एकाचवेळी राजीनामा दिला. देशातील राजकीय संकट पाहून राष्ट्रपतींनी मोठं पाऊल उचललं आहे. (Sri Lanka political crisis news)

पंतप्रधानांचा मोठा मुलगा नमल राजपक्षे यांनी रविवारी आपल्या पदाचा सुरूवातीला तडकाफडकी राजीनामा दिला. त्यांच्याकडे युवक आणि क्रीडा मंत्रालय होतं. त्यानंतर उरलेल्या सर्वच मंत्र्यांनी एका पत्रावर स्वाक्षरी करत पंतप्रधानांकडे राजीनामा सोपवला आहे. हे राजीनामे सध्या पंतप्रधानांकडे असून राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्याकडे सोपवतील. पण पंतप्रधान राजपक्षे आपला राजीनामा देण्याची तसेच लगेच नवीन मंत्रिमंडळ स्थापन करण्याची घाई करणार नाहीत, अशी चर्चा आहे.

त्यातच राष्ट्रपतींनी मोठं पाऊल टाकलं आहे. त्यांनी सोमवारी संयुक्तपणे सरकार स्थापन करण्यासाठी देशातील सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षांनाही आमंत्रित केलं आहे. राष्ट्रपती कार्यालयाने प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनानुसार, सर्व राजकीय पक्षांना मंत्रिमंडळात सहभागी होऊन मंत्रिपदं स्वीकारण्यासाठी आणि राष्ट्रीय संकटावर उपाय शोधण्यासाठी राष्ट्रपतींनी आमंत्रित केलं आहे.

राष्ट्रपती राजपक्षे हे पंतप्रधानांचे लहान बंधू आहेत. हे दोघे सोडल्यास सर्व जणांनी राजीनामे दिले आहेत. सध्या या दोघांवरच देशाची घडी पुन्हा बसवण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे राष्ट्रपतींकडून आता विरोधकांनाही साद घालण्यात आली आहे. राजपक्षे यांनी २०१९ मध्ये बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली आहे. त्यानंतर तीन वर्षांतच देशावर मोठं आर्थिक संकट घोंघावू लागलं आहे.

पंतप्रधान राजपक्षे यांच्या मुलाने वडिलांच्या सोशल मीडियावर बंदी घालण्याच्या निर्णयावर उघडपणे टीका केली आहे. पंतप्रधानांवरही राजीनाम्यासाठी दबाव वाढला आहे. देशातील खाद्यपदार्थ, इंधन आणि इतर आवश्यक वस्तुंचा तुटवडा आणि महागाई वाढल्याने मोठं संकट आलं आहे. नागरिकांना या वस्तु खरेदी करण्यासाठी लांबच लांब रांगामध्ये उभे राहावे लागत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी हिंसाचार होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT