New Delhi Railway Station stampede Sarkarnama
देश

New Delhi Railway Station stampede : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, कुंभमेळ्यासाठी निघालेल्या 18 भाविकांचा मृत्यू

New Delhi Railway Station Stampede : नवी दिल्लीतून प्रयागराज येथील कुंभमेळ्यासाठी निघालेल्या 18 भाविकांचा नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

Jagdish Patil

New Delhi Railway Station Stampede : नवी दिल्लीतून प्रयागराज येथील कुंभमेळ्यासाठी निघालेल्या 18 भाविकांचा नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत (New Delhi Railway Station stampede) दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रयागराज महाकुंभाला (Prayagraj Mahakumbhmela) जाण्यासाठी हजारो भाविक रल्वे स्टेशनवर जमा झाले होते. यावेळी प्लॅटफॉर्म नंबर 14 आणि 16 वर ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना अचानक ही चेंगराचेंगरी झाली.

यामध्ये 3 मुलांसह 18 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर अनेक जण गंभीर जखमी आहेत. या जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. या घटनेवर देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत 30 भाविकांचा मृत्यू

नुकतंच मौनी अमावस्येच्या दिवशी प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली होती. ज्यामध्ये 30 भाविकांचा मृत्यू झाला होता. अशातच आता नवी दिल्लीतील (New Delhi) घटनेत 18 भाविकांना जीव गमवावा लागला आहे.

PM मोदींनी व्यक्त केला शोक

दरम्यान, या दुर्घेटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) शोक व्यक्त केला आहे. "नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीमुळे मी व्यथित झालो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, त्यांच्याप्रती माझी मनापासून सहानुभूती आहे. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत"; अशी मी प्रार्थना करतो, असं ट्वीट करत पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT