Dawood Ibrahim Mumbai property auction price Sarkarnama
देश

Dawood Ibrahim: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवरुन भारत अन् UNमध्ये जुंपली! भारतानं दिला कडक इशारा

Dawood Ibrahim: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवरुन भारत अन् UNमध्ये जुंपली! भारतानं दिला कडक इशारा

Amit Ujagare

Dawood Ibrahim: संयुक्त राष्ट्रांच्या (युएन) दहशतवाद विरोधी रिपोर्टमध्ये भेदभाव केल्याच्या कारणावरुन भारतानं युएन रिपोर्ट्सवर कडाडून टीका केली आहे. यामध्ये कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या उल्लेखानं भारत आणि युएनमध्ये चांगलीच जुंपली आहे. याप्रकरणी भारतानं युएनला कडक इशारा देत या संघटनेनं आपली निष्पक्षता आणि उच्च मानकांची आब राखावी, अशा शब्दांत खडसावलं आहे. पासून भारतात दहशतवादी हल्ल्यांसाठी वॉन्टेड आहे. Dawood Ibrahim: संयुक्त राष्ट्रांच्या (युएन) दहशतवाद विरोधी रिपोर्टमध्ये भेदभाव केल्याच्या कारणावरुन भारतानं युएन रिपोर्ट्सवर कडाडून टीका केली आहे. यामध्ये

संयुक्त राष्ट्रांचे रिपोर्टर बेन सॉलयांनी आपल्या वृत्तामध्ये दाऊद इब्राहिमला भारत केंद्रीत डी-कंपनी क्रिमिनिल गँगचा नेता असं संबोधलं आहे. ज्याचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. यावर भारतानं नाराजी व्यक्त केली असून भारतीय राजदूत रघु पुरी यांनी युएन अमेम्ब्लीत सांगितलं की, आम्ही संयुक्त राष्ट्रांच्या विशेष प्रतिवेदक या मान्य न होणाऱ्या स्थितीवर गंभीर चिंता व्यक्त करत आहोत. चुकीच्या तथ्थ्यांवर आधारित अहवाल त्यांनी प्रसिद्ध केला आहे. यासाठी त्यांना जबाबदारही धरण्यात आलेलं नाही. यामुळं सदस्य देशांसमोर एक निश्चित बाब समोर येत आहे, जी या संघटनेसाठी दुर्देवी आहे. यामुळं संघटनेच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या (युएन) दहशतवाद विरोधी रिपोर्टमध्ये भेदभाव केल्याच्या कारणावरुन भारतानं युएन रिपोर्ट्सवर कडाडून टीका केली आहे. यामध्ये

रघु पुरी यांनी म्हटलं की, दाऊदच्या डी-कंपनीला भारतस्थित सांगण्यात आलं आहे. या अहवालात तथ्य नाही, त्यामुळं ते बदलायला हवं. युएन सिक्युरिटी काऊन्सिलद्वारे २००३ मध्ये इंडियास्थित डी-कंपनीच्या नेत्याला अल-कायदाशी लिंक करण्याबाबत लिस्ट केल्याचा उल्लेख आहे पण हे सांगण्यात आलेलं नाही की, दाऊद इब्राहिम १९९३ पासून दहशतवादी हल्लाप्रकरणी भारतातच वॉन्टेड आहे. तो भारतातून पळून गेलेला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT