Karnataka Elections 2023 C Voter Survey : कर्नाटकमध्ये मागील काही दिवसापासून निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. कोण बाजी मारणार याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे. आज कर्नाटक निवडणुकाच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. '१० मे' ला निवडणुकासाठी मतदान होणार आहे.
सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीमध्ये चांगलाच जोर लावला आहे. कर्नाटकमध्ये सत्ता कुणाची येणार हे अवघ्या पाच दिवसात स्पष्ट होईलच. पण 2024च्या लोकसभा निवडणुकीची ही रंगीत तालीम असल्याने सर्वच पक्षांनी त्यांची ताकद पणाला लावली आहे.
कर्नाटक निवडणुकीपुर्वी तीन सर्व्हेमध्ये काँग्रेस मोठ्या बहुमताने कर्नाटकामध्ये सत्तेत येणार असल्याचे सांगितले जात आहे. तर झी न्युज-मॅट्रिझने आपल्या जनमत सर्वेक्षणात भाजपला पुन्हा विजय मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.
एबीपी-सीव्होटर च्या ओपिनियन पोलनुसार, कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. पोलच्या आकडेवारीनुसार, कर्नाटकातील 224 विधानसभा जागांपैकी काँग्रेस 107 ते 119 जागा जिंकू शकते, तसेच 'जेडीएस'ला केवळ 25 ते 35 जागा मिळण्याची शक्यता आहे. या सर्वेक्षणात भाजप काँग्रेसपेक्षा पाच टक्के मतांनी पिछाडीवर आहे, म्हणजेच भाजपला 35 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 40 टक्के मते मिळू शकतात. तसेच 'जेडीएस'ला 17 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.
'इंडिया टुडे सी व्होटर'च्या ओपिनियन पोलनेही कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होण्याची शक्यता वर्तवली आहे. पोलनुसार 2018 च्या निवडणुकीपेक्षा भाजपला 24 जागा कमी मिळतील, म्हणजेच भाजप यावेळी फक्त 74-86 जागा जिंकू शकेल असे त्यामध्ये नमूद करण्याच आले आहे. 'इंडिया टुडे' च्या पोलनुसार, काँग्रेस पक्षनेते सिद्धरामय्या यांना सर्वाधिक पसंतीचे नेते म्हणून 42 टक्के मतांनी पसंती दर्शवली आहे. तर भाजपचे विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना 31 टक्के मतांसह दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक पसंतीचे नेते म्हणून पोलमध्ये दाखविण्यात आले आहे.
कन्नड मीडिया आउटलेट एडिनाने आपल्या पोलमध्ये दावा केला आहे की, काँग्रेस 132 - 140 जागा जिंकून प्रचंड बहुमताकडे वाटचाल करत आहे. तर भाजपला 33 टक्के मतांसह 57 जागा जिंकणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Edited by : Rashmi Mane
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.