BJP, Congress Sarkarnama
देश

Exit Poll : हरियाणा, जम्मू आणि काश्मीर निवडणुकीत काँग्रेसचं जोरदार कमबॅक, भाजपला धक्का; 'एक्झिट पोल'ची आकडेवारी काय सांगते ?

Haryana, Jammu & Kashmir Political News : हरियाणा, जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी नुकतेच मतदान पार पडले. त्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. सर्व एक्झिट पोलने या दोन्ही राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापनेचा अंदाज वर्तवला आहे.

Sachin Waghmare

New Delhi News : लोकसभा निवडणुकीनंतर होत असलेल्या हरियाणा, जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीत भाजपला धक्का बसत असल्याचे चित्र एक्झिट पोलने वर्तवले आहे. या अंदाजानुसार दोन्ही राज्यात काँग्रेसला बहुमत मिळताना दिसत आहे. हरियाणामध्ये 2014 पासून भाजपचे सरकार आहे. त्याठिकाणी आता कॉँग्रेसचे सरकार येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

हरियाणातील विधानसभेच्या 90 जागांसाठी शनिवारी एकाच टप्प्यात मतदान पार पडले होते. तर जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यांत मतदान प्रक्रिया पूर्ण झाली होती. त्यानंतर 'एक्झिट पोल'चे अंदाज समोर आले आहेत. त्यात दोन्ही राज्यांत काँग्रेसचे सरकार सत्तेत परतणार असल्याचा अंदाज समोर आला आहे. (Hariyana, Jammu Kashmir Exit Poll )

हरियाणातील विधानसभेच्या 90 जागांसाठी झालेल्या मतदानानंतर एक्झिट पोलनुसार काँग्रेसला (Congress) 40 ते 50 जागा मिळू शकतात. तर भाजपला (Bjp) 20-25 जागा मिळू शकतात. त्यामुळे सर्वांचे लक्ष या निकालाकडे लागलेले आहे.

जम्मू-काश्मीर विधानसभा निकालाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. याचे कारण म्हणजे येथे 10 वर्षांनंतर विधानसभा निवडणुका झाल्या आहेत आणि दुसरे म्हणजे या राज्याला सहा वर्षांनी मुख्यमंत्री मिळणार आहे.

शेवटच्या मुख्यमंत्री पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी)च्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती होत्या. त्यांनी 4 एप्रिल 2016 ते 19 जून 2018 पर्यंत मुख्यमंत्रिपद भूषवले होते. त्यानंतर येथे लेफ्टनंट जनरल हेच कारभार पाहतात.

2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधील कलम 370 आणि 35A हटवल्यानंतरची ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीत काय होणार याची उत्सुकता प्रत्येकांना लागली आहे. जम्मू-काश्मीरमधील विधानसभेच्या 90 जागांसाठी तीन टप्प्यात मतदान झाले.

हरियाणा विधानसभा निवडणुकीचा एक्झिट पोल:

मॅट्रिझ एक्झिट पोल

काँग्रेस - 55 -62

भाजप - 18-24

जेजीपी -0-3

इतर -02 -05

दैनिक भास्करचा एक्झिट पोल

काँग्रेस - 44-54

भाजप - 15-29

आयएनएलडी - 01-05

इतर- 06-09

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचा एक्झिट पोल:

मॅट्रिझ एक्झिट पोल

काँग्रेस+NC - 28-30

भाजप - 28-30

पीडीपी - 05-07

इतर- 08-16

दैनिक भास्करचा एक्झिट पोल

काँग्रेस+NC- 35-40

भाजप - 20-25

पीडीपी - 04-07

इतर- 12-16

ऍक्सिस माय इंडिया

काँग्रेस+NC - 35-4

भाजप - 24-34

पीडीपी - 04-06

इतर - 08-23

इंडिया टुडे सी-व्होटर एक्झिट पोल

काँग्रेस+NC - 40-48

भाजप - 25-27

पीडीपी - 06-12

इतर- 06-11

पीपल्स पल्स एक्झिट पोल

काँग्रेस+NC - 46-50

भाजप- 23-27

पीडीपी -07-11

इतर-04-06

मॅट्रिक्स एक्झिट पोल

काँग्रेस+NC - 28-30

भाजप - 28-30

पीडीपी -05-07

इतर -08-16

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT