PM Narendra Modi, Subramanian Swamy Sarkarnama
देश

PM Narendra Modi : भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा मोदींना इशारा; कोर्टात फौजदारी केस करणार... काय घडलं?

Subramanian Swamy News US President Donald Trump statement : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिलेल्या मदतीवरून मोठा दावा केला आहे.

Rajanand More

New Delhi News : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका विधानामुळे भारतातील राजकारण तापले आहे. भारतात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी अमेरिकेने 21 मिलियन डॉलर मदत केल्याचे ट्रम्प यांच्याकडून वारंवार सांगितले जात आहे. त्यावरून भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला होता. मात्र, ही मदत बांग्लादेशाला गेल्याचा दावा करत काँग्रेसने पलटवार केला आहे.

अमेरिकेच्या मदतीवरून राजकारण तापलेले असतानाच भाजप नेते सुब्रमण्यम स्वामींनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना इशारा दिला आहे. स्वामी यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. भारतामध्ये माझे मित्र पंतप्रधान मोदींना 21 मिलियन डॉलर जात असल्याचे विधान ट्रम्प यांनी केले होते. त्याचा एक व्हिडीओ सनातन धर्म या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावरून स्वामींनी इशारा दिला आहे.

काय म्हटले आहे स्वामींनी?

स्वामी यांनी सनातन धर्मच्या पोस्टवरून म्हटले आहे की, 21 मिलियन डॉलर मिळाले नसल्याबाबतचे स्पष्टीकरण मोदींनी द्यावे तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मानहानीची नोटीस पाठवावी. मोदींनी असे न केल्यास मी लोकहितार्थ मोदींना कारणे दाखवा नोटीस पाठवेन आणि कोर्टात फौजदारी केस दाखल करीन, असा इशारा सुब्रमण्यम स्वामींनी दिला आहे.

स्वामी यांनी त्याआधीही एक पोस्ट करत निधीबाबत मोदींनी संसदेत खुलासा करण्याबाबत म्हटले आहे. नरेंद्र मोदींनी संसद आणि निवडणूक आयोगाला सांगायला हवे की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून 21 मिलियन डॉलर का घेतले? हे जर 2019 च्या निवडणुकीसाठी होते तर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर जाहीर केले होते का, असा प्रश्नही स्वामींनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, निधीबाबत भाजप बॅकफूटवर गेली असून काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यूएसएड कडून भारतात कोणत्या राजकीय पक्ष, व्यक्ती, राजकीय एनजीओ आणि सांस्कृतिक संघटना पैसे मिळाले, कधी मिळाली याची माहिती द्यावी, मोदींनी 21 मिलियन डॉलर घेतले की नाही, हे देशाला सांगावे, अशी मागणी काँग्रेसकडून केली जात आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT