Goa News : भाजप नेते नितीन गडकरी हे असे नेते आहेत जे सातत्याने राजकारणाबाबत कोणताही किंतु परंतु न ठेवता बोलत असतात. ते आपल्या पक्षातील कोणतीही गोष्ट, कोणत्याही बड्या नेत्याचा मुलाहिजा न ठेवता, दबाव न बाळगता ठेवता थेट बोलतात. यामुळेच अनेकदा पक्षातील काही मंडळींचीही अडचण झाल्याचे पाहायला मिळते. अता अशीच अडचण गोव्यातील भाजपमधील नेत्यांची झालेली दिसत आहे. येथील एका कार्यक्रमात वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी थेट आपल्याच पक्षाचे कान टोचले आहेत. यामुळे गोव्यात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.
ढवळीकर हे रामनाथी येथे एका कार्यक्रमाप्रसंगी आले असताना त्यांनी आपले स्पष्ट मत ठेवले. यावेळी भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक देखील उपस्थित होते. तर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. यावेळी ढवळीकर यांनी, आदर्शवत उदाहरण दामू नाईक यांनी सर्वांना दाखवून दिले आहे. मात्र, काहींनी भाजपमध्ये राहून सर्व काही भोगल्यानंतर पक्षाला सोडचिठ्ठी दिली. आज तेच लोक पुन्हा एकदा भाजपमध्ये येण्यासाठी धडपडत आहेत. आता अशा लोकांवर विश्वास कसा ठेवायचा असा सवाल केला आहे. तसेच आशा लोकांना पक्षात न घेता निष्ठावंत कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवून पक्षाचे काम पुढे न्या, असा सल्ला त्यांनी दिला आहे. यामुळे नवे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हा सल्ला ऐकतात का ते पाहवं लागणार आहे.
रामनाथी येथे एका कार्यक्रमाप्रसंगी ढवळीकर आणि नवे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक एकत्र आले होते. यावेळी गोव्यातील अनेक भाजपच्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. त्यांची गर्दी पाहून ढवळीकर यांनी, दामू नाईक कार्याची पोचपावती असल्याचे म्हटले. तर कार्यकर्त्यांसह पक्षातील नेत्यांचे कान टोचताना, तुम्ही कोणत्याही पक्षात कार्यरत राहा, पण पक्षनिष्ठेला सर्वोच्च स्थान द्या, असा कानमंत्र दिला.
तसेच पक्षनिष्ठेला सर्वोच्च स्थान देणाऱ्याचा पक्ष एक ना एक दिवस सन्मान करतोच असेही ते म्हणाले. तर यावेळी ढवळीकर यांनी गडकरी यांच्याप्रमाणे वक्तव्य केले. काहीच दिवसांपूर्वी गडकरी यांनी, राजकारणाबद्दल माझ मत फारस चांगल नाही. इथे फक्त युज अँड थ्रो केला जातो. त्यामुळे पक्ष आणि संघटनेत माणूस म्हणून विचार करणे आवश्यक असल्याचं म्हणाले होते. तर आपल्या देशात विचारभिन्नता समस्या नसून विचार शून्यात ही समस्या आहे. यामुळेच सत्तेत असणाऱ्या पक्षात घुसण्यासाठी चढाओढ असते. मात्र जेव्हा सत्ता जाते तेंव्हा जसे जहाज बुडताना उंदीर उड्या मारतात तसेच अनेक जण उड्या मारतात, असा टोला पक्षांतर करणाऱ्यांना लगावला होता.
याप्रमाणेच आता ढवळीकर यांनी, आजच्या राजकारणात काही लोक पराभूत झाल्यानंतर दुसऱ्या पक्षाशी संधान बांधण्याचे प्रयत्न करतात. काही पक्षात प्रवेश करून निवडूनही येतात. पण जेव्हा हातात सत्ता मिळत नाही. ते दुसऱ्या पक्षाचा रस्ता धरतात. यात काही माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी सुदिन ढवळीकर यांनी, पक्षबदलू प्रकारावर टीका करताना, ही राजकीय चित्र कुठेतरी थांबला पाहिजे. पक्षांतर करणाऱ्या अशा स्वार्थी राजकारणी लोकांमुळे संपूर्ण राजकारणाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन दूषित होत आहे. सतत पक्ष बदलल्यामुळे आमदार आपली किंमत कमी करून घेत आहेत. हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे, असा टोला लगावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.