Sukesh Chandrasekhar on AAP defeat : तिहार तुरुंगात बंद असलेला बदमाश चंद्रशेखरने आम आदमी पार्टीचे संयोजक अन् दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात सुकेश यांनी केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना निवडणडणुकीतील पराभवावरून टोला लगावत अभिनंदन केले आहे.
सुकेशने लिहिले की, सर्वात अगोदर मी तुमचे, मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना आपल्याच मतदासंघात पराभूत झाल्याबद्दल अभिनंद करतो. सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट ही आहे की, तुमची भ्रष्ट पक्ष आता सत्तेतून बाहेर झाला आहे.
तसेच, पत्रात सुकेशने दावा केला आहे की, त्याने आधीच इशारा दिला होता की केजरीवाल(Arvind Kejriwal) आपली जागा गमावणार आणि पक्ष सत्तेतून बाहेर होईल. सुकेशने म्हटले की, जर तुमच्याकडे माझी जुने पत्रं सुरक्षित असतील, तर कृपया ते एकदा बघा. मी तुम्हाला तीन, सहा आणि आठ महिने आधीच इशारा दिला होता की तुम्ही निवडणूक हारणार आहात आणि आज तेच घडलं आहे.
सुकेश चंद्रशेखरने निशाणा साधत म्हटले की, तुमचा सर्व अहंकार तुमच्यासोबतच शौचालयात वाहून गेला. दिल्लीच्या जनतेने तुम्हाला आणि तुमच्या जगातील सर्वात भ्रष्ट पार्टीला खरोखरच लाथ मारली आहे. सुकेश चंद्रशेखरने केजरीवालांना राजकारणातून संन्यास घेण्याचा सल्ला दिला आणि म्हटले की पुढील वेळी पंजाबमधूनही आम आदमी पार्टीचा सफाया होईल.
चंद्रशेखर मनी लॉन्ड्रिंग आणि फसवेगिरीच्या अनेक प्रकरणात तिहार तुरुंगात बंद आहे. याआधीही त्याने केजरीवाल आणि आम आदमी पार्टीच्या(AAP) नेत्यांविरोधात अनेकदा पत्र लिहिले आहे.
भाजपने(BJP) 70 पैकी 48 जागांवर विजय मिळवला, म्हणजेच दिल्लीच्या जवळपास दोन तृतीयांश जागा जिंकल्या. भाजप जवळपास अडीच दशकानंतर दिल्लीत सत्तेवर आली आहे. तर मागील दहा वर्षांपासून दिल्लीत सत्तेवर असणाऱ्या आम आदमी पार्टीला मात्र या निवडणुकीत अवघ्या 22 जागा जिंकता आल्या आणि त्यांची विजयाची हॅटट्रिकही हुकली. तर दुसरीकडे काँग्रेसने मात्र एकी जागा न जिंकता आपले खाते न उघडण्याच हॅटट्रिक मात्र केली.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.