Sunburn Festival Goa 2023 Sarkarnama
देश

Sunburn EDM Festival: गोव्यातील ‘सनबर्न’ फेस्टिव्हल वादात; शंकराच्या फोटोपुढे दारू पिऊन नाचगाणे

Anand Surwase

Sunburn EDM Festival : गोव्यात नुकताच पार पडलेला 'सनबर्न ईडीएम फेस्टीव्हल' (Sunburn EDM Festival) वादात सापडला आहे. या सनबर्न फेस्टीव्हलमध्ये हिंदू देवदेवतांचा अपमान केला गेल्याचा आरोप काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने केला आहे. या प्रकरणी आयोजकांवर कारवाई करण्याची मागणी दोन्ही पक्षांकडून करण्यात आली आहे. तसेच काँग्रेस नेते विजय भिके यांनी या प्रकरणी म्हापसा पोलिस ठाण्यात आयोजकांविरोधात तक्रारही दाखल केली आहे.

पणजीमध्ये 28 ते 30 डिसेंबर या कालावधीत लोकप्रिय "सनबर्न ईडीएम" या संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात सहभागी झालेले पर्यटक संगीताच्या तालावर नाचताना मद्यप्राशन करत होते. त्याच दरम्यान या उत्सवामध्ये लावण्यात आलेल्या स्क्रीनवर शंकराचा फोटो प्रदर्शित करण्यात आला होता. जोरदार आवाजात म्युझिक आणि दारू पिऊन स्क्रीन समोर नाचणारे पर्यटक हा हिंदूच्या देवतांचा अपमान असल्याचा आरोप काँग्रेस आणि आप नेत्यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गोव्यातील सनबर्न फेस्टीव्हलमध्ये नाचगाणी सुरू असताना पर्यटकांकडून दारूचे सेवण केले जाते. अशावेळी स्क्रीनवर भगवान शंकरांचा फोटो लावला गेला. हा प्रकार सनातन धर्माच्या भावनांना ठेच पोहोचवणारा आहे. त्यामुळे या प्रकरणी सरकारने आयोजकांवर कारवाई करावी, अशी मागणी आपचे गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी केली आहे.

सनबर्न फेस्टीव्हलमध्ये शंकराचा फोटो लावून नाचगाणी केल्यामुळे सोशल मीडियावर देखील तरुणाईकडून राग व्यक्त करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी आयोजक आणि गोवा सरकारविरोधात टीकाही करण्यात येत आहे. त्यामुळे आता गोव्यातील डॉ.प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वातील भाजप (BJP) सरकार सनबर्न फेस्टीव्हलच्या आयोजकांविरोधात काय कारवाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

(Edited By Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT