नवी दिल्ली : कर्नाटकात सुरु असलेल्या हिजाब प्रकरणावरुन ( Karnataka Hijab Controversy)सध्या वाद सुरु आहे. या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आव्हान देण्यात आले होते. याबाबत सुप्रीम कोर्टाने सुनावणी करण्यास नकार दिली आहे. सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयात आहे. सुप्रीम कोर्टाने हिजाब प्रकरणी दुसऱ्यांदा सुनावणी करण्यास नकार दिला आहे. या निर्णयामुळे याचिकाकर्त्याला मोठा झटका बसला आहे.
''योग्य वेळ आल्यावर या प्रकरणाची सुनावणी केली जाईल,'' असे सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. कर्नाटकात काय होत आहे, यावर आमचं लक्ष आहे, हा राष्ट्रीय पातळीवरील मुद्दा बनवू नका आणि योग्यवेळी त्यात हस्तक्षेप केला जाईल. हिजाबचा मुद्दा धार्मिक आणि राजकीय बनवू नका, असे सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे.
हिजाब, बिकिनी, घुंघट, जीन्स यांचे प्रियंका गांधी यांनीही समर्थन केले होते. त्यावर देसाई यांनी टीका केली आहे. ओढणी, हिजाब, घुंघट घ्यावे का, हे महिलांचे स्वातंत्र्य आहे असे एकीकडे म्हणायचे आणि एकीकडे या विशिष्ठ वस्त्रांची स्तुती करायची हा दुटप्पी प्रकार आहे. अशी खोटी स्तुती करून ही वस्त्रे परिधान करण्यासाठी ते महिलांवर दडपण आणत आहेत, ही प्रतिगामी विचारसरणी आहे, अशी टीका देसाई यांनी केली आहे. त्याऐवजी महिलांच्या अंगावरील सैन्याचा वा पोलिस गणवेश हाच दागिना आहे, असेच सर्वांनी म्हटले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini)यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शाळेत हिजाब घालून येण्याला विरोध केला आहे. ''शाळा आणि महाविद्यालयं ही शिक्षणासाठी असतात. त्यामुळे धर्मिक गोष्टी शाळेत घेऊन जाणं योग्य नाही. प्रत्येक शाळेचा एक गणवेश असतो आणि त्याचा सन्मान सर्वांनी करायला हवा. शाळेच्या बाहेर तुम्हाला जे काही घालायचं आहे ते घालण्याचा तुम्हाला स्वातंत्र्य आहे. पण शाळेत तुम्ही गणवेशच घालायला हवा,'' असं हेमा मालिनी म्हणाल्या. (Supreme Court has refused to hear the Hijab case of Karnataka)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.