Uddhav Thackeray News, CM Eknath Shinde News,
Uddhav Thackeray News, CM Eknath Shinde News,  Sarkarnam
देश

मोठी बातमी : राज्याच्या सत्तानाट्यावर २० जुलैला सर्वोच्च सुनावणी

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) 20 जुलैला सुनावणी होणार आहे. ही सुनावणी सरन्यायाधीष एन. व्ही. रामण्णा यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर होणार आहे. यामध्ये न्यायमुर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमुर्ती हिमा कोहली यांचा समावेश आहे.

अपात्रतेसंदर्भात शिवसेनेच्या (Shivsena) वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर बुधवारी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाकडून जवळपास सात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये १७ आमदारांना अपात्र करण्याची याचिका आहे.

शिवसेना बंडखोरीबाबतच्या सर्व याचिकांवर सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली सुनावणीही होणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय यावर काय निरिक्षणे नोंदवते आणि काय निकाल देते याकडे राज्यातील सर्वांचेच लक्ष लागले आहे. यामुळे राज्यात घडलेल्या सत्ता नाट्यावर काय परिनाम होतो हेही पाहवे लागणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. 11 जुलै रोजी न्यायालयाने या प्रकरणावर तातडीने सुनावणी करता येणार नसल्याचेही स्पष्ट केले होते.

सर्वोच्च न्यायालयात कोणत्या याचिकांवर सुनावणी प्रलंबित?

16 आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नोटिशीला शिंदे गटाचे आव्हान

एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाला शिवसेनेकडून आव्हान

विधानसभा अध्यक्ष निवडीची अनुमती देण्याच्या निर्णयाविरोधात याचिका

विश्वासदर्शक ठरावाचे निर्देश देण्याच्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या आदेशालाही शिवसेनेकडून आव्हान देण्यात आले आहे.

एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ गटनेतेपदी कायम ठेवून चौधरींची नियुक्ती रद्द करण्याला आव्हान देणारी याचिका

एकनाथ शिंदे यांना गटनेते आणि भरतशेट गोगावले यांना प्रतोदपदी निवडीला मान्यता देण्याच्या निर्णयाला शिवसेनेचे आव्हान

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT