Sushil Kumar Modi Sarkarnama
देश

Sushil Kumar Modi : मोठी बातमी! कॅन्सरशी झुंज अपयशी; बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदींचं निधन

सरकारनामा ब्यूरो

Former Deputy Chief Minister of Bihar : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि माजी राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदी यांचे सोमवारी(13 मे) निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कॅन्सरशी झुंज देत असलेल्या सुशीलकुमार मोदींवर मागील काही दिवसांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते.

कॅन्सर झाल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारकार्यात सहभागी होऊ शकणार नसल्याचे त्यांनी स्वत:च ट्वीटद्वारे कळवलं होतं. पंतप्रधान मोदींना याबाबत माहिती दिल्याचं ते म्हणाले होते. सुशीलकुमार मोदी 72 वर्षांचे होते आणि 5 जानेवारी 1952 रोजी त्यांचा जन्म झाला होता. सुशील कुमार मोदींच्या(Sushil Kumar Modi ) निधनाबद्दल बिहारमधील राजकीय वर्तुळात तसेच अनेक राजकीय नेत्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आपल्या तीन दशकांपेक्षा अधिकच्या राजकीय कारकर्दीत सुशील कुमार मोदी आमदार, विधानपरिषद सदस्य, लोकसभा सदस्य आणि राज्यसभा सदस्य सुद्धा होते. 2005 ते 2013 आणि 2017 ते 2020 पर्यंत ते बिहारचे उपमुख्यमंत्री होते. पाटणा विद्यापीठात एक विद्यार्थी कार्यकर्ता म्हणून सुरू झाले होते. ते 1973मध्ये पाटणा विद्यापिठाचे विद्यार्थी संघाचे सरचिटणीस बनले होते. यानंतर पुढे 1990 मध्ये ते सक्रीय राजकारणात आले होते आणि त्यांनी पाटणा सेंट्रल विधानसभा म्हणजे आताचा कुम्हरार विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती व विजयी सुद्धा झाले होते. ते 2004 पासून भागलपूरमधून लोकसभेचे सदस्य बनले होते.

सुशील कुमार मोदी यांनी ३ एप्रिल रोजी जनतेसाठी आपला शेवटचा संदेश दिला होता. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले होते की, 'मागील सहा महिन्यांपासून मी कॅन्सरशी संघर्ष करत आहे. आता वाटतंय की लोकांना सांगण्याची वेळ आली आहे. लोकसभा निवडणुकीत काही करू शकणार नाही. पंतप्रधानांना सर्व काही सांगितलं आहे. देश, बिहार आणि पक्षाचा सदैव आभारी आणि समर्पित.' असे त्यांचे शेवटचे शब्द होते.

यानंतर जेव्हा ते बिहार विमानतळावर दिसले तेव्हा त्यांची प्रकृती पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा फोटो काढू देण्यास नकार दर्शवला होता. अखेर आज त्यांच्या निधनाची बातमी आली यामुळे सर्वचस्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT