Sushil Kumar Modi Sarkarnama
देश

Sushil Kumar Modi News : निवडणुकीत काही करू शकत नाही, मला कॅन्सर! भाजप नेत्यानं दिला धक्का

Rajanand More

Bihar News : बिहारमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी (Sushil Kumar Modi News) हे मागील सहा महिन्यांपासून कॅन्सरशी झुंज देत असल्याचे समोर आले आहे. त्यांनीच एक्स हँडलवरून ही माहिती देत सर्वांना धक्का दिला आहे. कॅन्सरमुळे आपण लोकसभा निवडणुकीत काहीच करू शकत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

सुशील मोदी यांनी म्हटले आहे की, ‘मागील सहा महिन्यांपासून कॅन्सरशी (Cancer) संघर्ष करत आहे. आता असे वाटले की, लोकांना सांगण्याची वेळ आली आहे. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) काहीच करू शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) सगळे सांगितले आहे. देश, बिहार (Bihar) आणि पक्षाचे आभार आणि सदैव समर्पित,’ अशी भावना मोदींनी व्यक्त केली आहे.  

राज्यसभेचे (Rajya Sabha) माजी खासदार असलेल्या सुशील मोदींना पुन्हा राज्यसभेचे तिकीट मिळण्याची शक्यता होती. फेब्रुवारी महिन्यात भाजपने (BJP) उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर त्यांचे नाव दिसले नाही. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत उतरवले जाऊ शकते, अशीही चर्चा होती. मागील काही दिवसांपासून ते राजकीय वतुर्ळात फारसे सक्रियही नव्हते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चारही सभागृहांचे होते सदस्य

सुशील कुमार मोदी हे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद या चारही सभागृहांचे सदस्य होते. त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ नुकताच संपला. मात्र, पुन्हा उमेदवारी देण्यात आली नाही. 2004 मध्ये त्यांनी भागलपूर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक जिंकली होती. त्यानंतर ते बिहारचे उपमुख्यमंत्री बनले. 2005 ते 2013 या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून काम केले आहे. त्यानंतर नितीश कुमार आरजेडीसोबत गेले. त्यावेळी ते विधान परिषदेत विरोधी पक्षनेते होते. नितीश कुमार एनडीएत परतल्यानंतर ते पुन्हा उपमुख्यमंत्री बनले होते.

बिहारमध्ये मागील तीन दशके भाजपचा चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत ते सक्रिय नसल्याने भाजपसाठीही हा धक्का आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणूनही काम केले आहे. राज्यात ते भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणूनही काही काळ चर्चेत होते.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT