India Pakistan intelligence leak : भारताच्या सुरक्षेशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या गंभीर आरोपावरून उत्तर प्रदेशातील दोन कामगारांना मालपे पोलिसांनी अटक केली आहे.
रोहित (वय 29) आणि संत्री (37) अशी आरोपींची नावे असून ते दोघेही उडुपीतील कोचीन शिपयार्ड कंपनीत उपकंत्राटदारामार्फत कार्यरत होते. कोचीन शिपयार्ड कंपनी ही केंद्र सरकारच्या बंदरे, नौकानयन आणि जलवाहतूक विभागाच्या अंतर्गत येणारी महत्त्वाची संस्था आहे.
या ठिकाणी मेसर्स सुष्मा मरीन प्रायव्हेट लिमिटेड या उपकंत्राटदाराकडे इन्सुलेटर म्हणून काम करणारा रोहित यापूर्वी केरळमधील कोची इथल्या कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्येही कार्यरत होता. भारतीय (India) नौदलाची जहाजे बांधली जाणारे हे महत्त्वाचे केंद्र असल्याने तिथं अत्यंत गोपनीय माहिती हाताळली जाते.
कोची इथं काम करत असताना रोहितने जहाजांचे क्रमांक आणि नौदलाशी संबंधित इतर संवेदनशील माहिती व्हॉट्सअॅपद्वारे पाकिस्तानशी (Pakistan) संबंध असल्याचा संशय असलेल्या एका अनधिकृत व्यक्तीस बेकायदेशीरपणे पाठवल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यातून त्याने आर्थिक लाभही घेतल्याचे म्हटले जाते.
या प्रकरणी मालपे इथल्या कोचीन शिपयार्डच्या सीईओ यांनी दिलेल्या तक्रारीवरून मालपे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविली. गोपनीयता कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. उडुपी जिल्हा पोलिस अधीक्षक हरिराम शंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना तीन डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
रोहित याची मालपे इथं बदली झाल्यानंतर त्याने कोचीतील मित्राकडून मिळालेली माहिती पुन्हा पाकिस्तानातील व्यक्तीला दुसऱ्यांदा शेअर केली. ज्यामुळे देशाच्या सार्वभौमत्व आणि सुरक्षेला धोका निर्माण झाला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.