Suvendu Adhikaru on Muslim MLA: पश्चिम बंगाल मध्ये आगामी वर्षात (2026) विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी आत्तापासूनच राजकीय वातावरण तापण्यास सुरवात झाली आहे. पश्चिम बंगालमधील विरोधीपक्षनेते सुवेंदु अधिकारी नेहमीच आपल्या विधानामुळे चर्चेत असतात.
मुस्लिम आमदारांबाबत सुवेंदु अधिकारी यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. त्यामुळे ते सत्ताधाऱ्यांसह मुस्लिम समाजाच्या निशाण्यावर आहेत. त्यांच्या विधानाने पश्चिम बंगालचे राजकारण पेटलं आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीनंतर भाजप सत्तेत आल्यावर मुस्लिम आमदारांना बाहेर फेकून देऊ, असे विधान त्यांनी केले आहे. सुवेंदु अधिकारी यांच्या या विधानानंतर टीएमसी नेत्यांनी त्यांच्यावर हल्लाबोल करण्यास सुरवात केली आहे.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सुवेंद्र यांना 17 फेब्रुवारी रोजी विधानसभेतून निलंबित करण्यात आले आहे . अर्थंसंकल्पीय अधिवेशन असेपर्यंत ते निलंबित असणार आहेत. त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सरकार धार्मिकतेच्या आधारेवर राज्य चालवित आहे, असे ते म्हणाले होते.
सुवेंद्र अधिकारी यांचे मानसिक संतलून बिघडले असल्याचे टीएमसीच्या नेत्यांनी म्हटलं आहे. विधानसभा आणि संसदेत अनेक मुद्यांवरुन लोकप्रतिनिधीमध्ये मतभेद असू शकतात, पण धर्मांच्या नावावर आपल्या सहकारी आमदारांवर धर्माच्या नावावरुन टीका करणे हे संविधानाच्या विरोधात आहे, असे टीएमसीचे प्रवक्ता कुणाल घोष यांनी सांगितले. समाजात व्देष पसरवण्यासाठी विकृत मानसिकतेतून केलेले हे विधान आहे, असे घोष म्हणाले.
सुवेंदु अधिकारी यांच्या विधानावर भाजपच्या कुठल्याही नेत्याने यावर विधान केलेले नाही. सुवेंदु अधिकारी यांनी यापूर्वीही भाजपला अडचणीत आणणारे विधान केले होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपला अपयश आले होते, तेव्हा भाजपच्या 'सबका साथ, सबका विकास'या घोषणला दूर सारत त्यांनी 'जो हमारे साथ हैं, हम उनके साथ हैं. हमें अल्पसंख्यक मोर्चे की जरूरत नहीं है' असे विधान केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.