Suvendu Adhikari News : पश्चिम बंगालमध्ये आता शासकाचे नव्हे, तर कायद्याचे राज्य असेल," अशी ग्वाही मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी दिली. पोलिस प्रशासनाच्या बैठकीला उद्देशून भाषण करताना त्यांनी ही घोषणा केली. दरम्यान, "तृणमूल काँग्रेसकडून झालेला छळ आम्ही विसरलेलो नाहीत, त्यामुळे सर्व राजकीय गुन्ह्यांची सखोल चौकशी करण्यात येईल," असा थेट इशारा त्यांनी दिला. त्यामुळे भाजप आणि टीएमसीमधील संघर्ष अधिक पेटणार असल्याची चिन्हे आहेत.
सुवेंदू अधिकारी यांनी यावेळी राज्यातील 'पोलिस कल्याण मंडळ' बरखास्त करण्याचीही घोषणा केली. हे मंडळ एका राजकीय पक्षाची शाखा बनल्याचा ठपका त्यांनी ठेवला. ते म्हणाले, "पोलिस कल्याण मंडळ चांगल्या हेतूने स्थापन झाले होते, परंतु कालांतराने ते एका पक्षाच्या आघाडीची संघटना बनले. पोलिसांचे यातून किती 'कल्याण झाले माहिती नाही मात्र नोकरीत बेकायदा मुदतवाढ मिळविण्याचे ते केंद्र बनले होते.
काही व्यक्तींनी याचा वैयक्तिक लाभ उठविला. त्यामुळे आज आम्ही हे मंडळ बरखास्त करत आहोत. पोलिस सुधारणांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून, तीन महिन्यांत नवा आराखडा सादर करण्याचे काम ती करेल." नागरिकांना पटेलिसांनी त्रास दिल्यास त्यांनी ठाण्येरि जाऊन तक्रार करावी, कायदा सर्वांसाठी समान आहे, असे त्यांनी सांगितले.
कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या संरक्षणाबाबत आम्ही ठाम आहोत. कायदा आणि सुव्यवस्था राखताना पोलिसांवर होणारे हल्ले सरकार सहन करणार नाही, अशा प्रकरणांतील गुन्हेगारांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल," असा इशारा देखील त्यांनी दिला.
तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी राजकारणात आल्यापासून गेल्या दशकभरात डायमंड हार्बरमधील जनतेला मतदानाचा हक्क बजावता आलेला नाही," असा आरोप मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी शनिवारी केला. "आता परिस्थिती बदलली असून, या लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या फाल्टा विधानसभा मतदारसंघात २१ मे रोजी होणारे फेरमतदान मतदारांचा हक्क पुन्हा प्रस्थापित करेल," अशी ग्वाही त्यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.