Dhananjay Chandrachud Sarkarnama
देश

Shiv Sena MLA Disqualification : दोन महिन्यांत निर्णय घ्या, न्यायालयाचा अपमान होऊ नये; सरन्यायाधीश चंद्रचूडांनी सुनावले !

Chetan Zadpe

Shiv Sena Disqualification : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या दिरंगाईसंदर्भातल्या याचिकांवरची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. सिव्हिल ट्रायलपेक्षाही विधानसभा अध्यक्षांचे वेळापत्रक किचकट असल्याचा मुद्दा ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात मांडलेला आहे. आता न्यायालयाने या संदर्भात महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. (Latest Marathi News)

"विधानसभा अध्यक्षांनी पुढील दोन महिन्यांत निर्णय घ्यावा,' असं सरन्यायाधीशांनी म्हटले आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालय गांभीर्याने घेत आहे, याची नोंद घ्यावी. न्यायालयाच्या निकालाची अवहेलना होता कामा नये,' अशा स्पष्ट शब्दांत सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांना सुनावले आहे.

विधानसभा अध्यक्षांनी तयार केलेलं न्यायालयाला मान्य नाही, नवीन वेळापत्रक तयार करावी, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. यामुळे आता १७ ऑक्टोबरपर्यंत नवं वेळापत्रक जाहीर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे.

विधानसभेचे अध्यक्ष आमदार अपात्रता प्रकरणात दिरंगाई करत आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकांवर एकत्र सुनावणीची प्रक्रिया पार पडत होती. यासाठी खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड तर ठाकरेंकडून खासदारअनिल देसाई सुनावणीसाठी उपस्थित होते.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT