Taliban will kill me no one to help says Zarifa Ghafari 
देश

तालिबानी कधीही येतील अन् आम्हाला मारतील! पहिल्या महिला महापौर हतबल

गफारी यांच्यावर एकदा हल्लाही झाला होता. त्यांचे वडील जनरल अब्दुल वासी गफारी यांची तालिबान्यांनी मागील वर्षीच हत्या केली आहे.

वृत्तसंस्था

काबूल : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानने (Taliban) सत्ता स्थापन केली आहे. तालिबान्यांनी काबूलमध्ये पाऊल ठेवताच अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी (Ashraf Ghani) देश सोडून पळाले आहेत. इतर अनेकांनी देशातून पलायन केलं असून अनेक जण देश सोडण्यासाठी झगडत आहेत. पण अनेकांना बाहेर पडणे शक्य नाही. अफगाणिस्तानमधील पहिल्या आणि सर्वात तरूण महिला महपौर जरीफा गफारी यांचीही हीच स्थिती झाली आहे. (Taliban will kill me no one to help says Zarifa Ghafari)

गफारी या 2018 मध्ये अफगाणिस्तानमधील पहिल्या महिला महापौर बनल्या आहेत. त्यानंतर त्यांना तालिबान्यांकडून अनेकदा धमकी आली आहे. त्यांच्यावर एकदा हल्लाही झाला होता. त्यांचे वडील जनरल अब्दुल वासी गफारी यांची तालिबान्यांनी मागील वर्षीच हत्या केली आहे. गफारी या देशातील तरूणाईबद्दल खूपच आशावादी होत्या. युवकांसाठी त्यांचे सतत प्रयत्न सुरू होते. पण तालिबान्यांनी सत्ता ताब्यात घेतल्यानंतर त्यांची निराशा झाली आहे. 

एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेशी बोलताना गफारी म्हणाल्या, मी घरी बसले आहे आणि तालिबान्यांच्या येण्याची वाट पाहतेय. इथे कोणीही माझी आणि माझ्या कुटूंबाची मदत करण्यासाठी नाही. ते लोक माझ्यासारख्या लोकांसाठी येतील आणि आम्हाला मारतील, अशी व्यथा 27 वर्षांच्या गफारी यांनी मांडली आहे. 

दरम्यान, काबूलमध्ये सध्या असलेल्या गोंधळाच्या वातावरणाला घनी यांचे पलायन कारणीभूत आहे. अमेरिकेसह तिचे सहकारी देश आणि भारताला अफगाणिस्तानमधील आपले अधिकारी आणि कर्मचारीही वेळेत बाहेर काढणे शक्य झाले नाही. काबूल विमानतळावर काल अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे सरकारचीही नाचक्की झाली आहे. घनी हे आधी झालेल्या कराराप्रमाणे वागले असते तर सर्वच गोष्टी सुरळीतपणे पार पडल्या असत्या. परंतु, ते अफगाणिस्तान, तेथील जनता आणि इतर देशांना तोंडावर पाडून पळून गेले. यामुळे सर्वच गोष्टी बिघडल्या आहेत, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. 

अफगाणिस्तानमधून पळालेले घनी ताजिकिस्तानमध्ये आश्रयास गेले होते. तेथे त्यांच्या विमानास उतरण्यास नकार मिळाला. ताजिकीस्तानचे दरवाजे बंद झाल्याने घनी हे ओमानमध्ये तात्पुरते आश्रयास गेले आहेत. ते तेथून अमेरिकेत जाण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांच्यासमोर आश्रयासाठी शेवटचा पर्याय अमेरिकाच आहे. दरम्यान, देशाला संकटात वाऱ्यावर सोडून घनी पळाल्याने त्यांच्या विरोधात जनतेत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT