Tamil Nadu Chief Minister Joseph Vijay announces the closure of 717 TASMAC liquor shops near religious places, schools, and bus stands.  Sarkarnama
देश

TASMAC shops ban : मुख्यमंत्री थलपती विजय यांचा दारू विक्रेत्यांना मोठा दणका! तमिळनाडूतील 'ती' सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश

Tamil Nadu TASMAC Shops Ban : तमिळनाडूच्या मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतल्यापासून विजय यांनी आपल्या कारकि‍र्दीची सुरूवात धडाकेबाज पद्धतीने केल्याचं पाहायला मिळालं. अशातच आता मुख्यमंत्री विजय यांनी आणखी एक असाच धाडसी आणि मोठा निर्णय घेतला आहे.

Jagdish Patil

Tamil Nadu TASMAC Shops Ban : तमिळनाडूच्या मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतल्यापासून मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. यामध्ये त्यांनी तमिळनाडूतील घरगुती वीज ग्राहकांना दर दोन महिन्याला २०० युनिट मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे.

तसंच त्यांनी राज्यातील अमली पदार्थांचे जाळे मुळापासून उपटून टाकण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष पथकाची नियुक्ती केली आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी एका सुरक्षा दलाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे विजय यांनी आपल्या कारकि‍र्दीची सुरूवात धडाकेबाज पद्धतीने केल्याचं पाहायला मिळालं. अशातच आता मुख्यमंत्री विजय यांनी आणखी एक असाच धाडसी आणि मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे आता तमिळनाडूत धार्मिक स्थळे, शैक्षणिक संस्था आणि बस स्थानकांच्या ५०० मीटरच्या परिसरातील सरकारमान्य ७१७ 'टास्मॅक' दारूची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबतचा सरकारी आदेश विजय सरकारने काढला असून पुढील दोन आठवड्यांत या निर्णयाची अंमलबजावणी करणं बंधनकारक आहे. तर विजय यांनी घेतलेल्या या निर्णयाचे तमिळनाडूतील नागरिकांकडून जोरदार स्वागत केलं जात आहे.

तसं पाहायला गेलं तर तामिळनाडूत दारूची दुकाने हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. मागील अनेक दिवसांपासून महाविद्यालये, धार्मिक स्थळे याच्याजवळ दारूची दुकाने नकोत अशी मागणी नागरिकांकडून सुरू होती.

मात्र, या दुकानांमधून मिळणाऱ्या महसुलामुळे आधीच्या सरकारने या दुकानांवर कारवाई करणं टाळलं होतं. मात्र, मुख्यमंत्री विजय यांनी महसूलाची चिंता न करता थेट दारूच्या दुकांनावर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतल्यामुळे त्यांचं सध्या राज्यभरातून कौतुक केलं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT