Tamil Nadu government update : तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी बुधवारी विधानसभेत विश्वासदर्शक प्रस्ताव जिंकत आपल्या सरकारची ताकद दाखवून दिली. त्याआधी राज्याच्या राजकारणात बऱ्याच अनपेक्षित घडामोडी घडल्या. या घडामोडी घडत असतानाच विजय यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतले. मात्र, विजय यांचे निकटवर्तीय ज्योतिषी व टीव्हीके पक्षाचे प्रवक्ते रिकी राधन पंडित वेट्रिवेल यांची मुख्यमंत्री कार्यालयात ओएसडी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती चांगलीच वादात सापडली होती.
विजय यांनी मंगळवारीच हा निर्णय घेतला होता. रिकी राधन पंडित यांच्यावर विजय यांचा खूप विश्वास असल्याने त्यांना थेट ओएसडी म्हणून बढती देण्यात आल्याची चर्चा होती. या निर्णयावरून मित्रपक्षातील नेत्यांसह विरोधी पक्षांकडूनही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. सोशल मीडियातही त्याविरोधात बरीच चर्चा सुरू झाली.
टीका झाल्यानंतर विजय सरकारने आपला निर्णय २४ तासांतच मागे घेतला आहे. रिकी राधन पंडित यांना ओएसडी पदावर नियुक्ती करण्याचा निर्णय मागे घेण्यात आल्याचा आदेश बहुमत चाचणी झाल्यानंतर तातडीने जारी करण्यात आला आहे. विजय यांच्यासाठी ही नामुष्की मानली जात आहे. शपथविधीनंतर तीन दिवसांतच त्यांना एका महत्वाच्या निर्णयावरून यू-टर्न घ्यावा लागला आहे.
बहुमत चाचणीआधी विजय यांच्या या निर्णयावर व्हीसीके, डाव्या पक्षांनी आक्षेप घेतला होता. व्हीसीकेचे आमदार वाणी अर्सू यांनी सरकारने ज्योतिषांऐवजी वैज्ञानिक गोष्टींवर अधिक भर द्यावा, अशी विनंती केली होती. डाव्या पक्षांनीही अशीच भूमिका मांडली. विजय यांच्या या निर्णयाची थेट जयललितांशी तुलना होऊ लागली होती. जयललिता यांचाही ज्योतिषशास्त्रावर विश्वास होता, असे मानले जाते.
टीकेचे धनी झालेल्या विजय यांनीही हा निर्णय मागे घेण्याबाबतचे संकेत दिले होते. बहुमत चाचणी झाल्यानंतर विजय म्हणाले होते की, 'विविध राजकीय पक्षांचे मत विचारात घेऊन नियुक्तीचा पुनर्विचार केला जाईल.' त्यानंतर लगेचच सरकारकडून नियुक्ती रद्द करण्यात आल्याचा आदेश काढण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.