Mohammad Azharuddin Sarkarnama
देश

Mohammad Azharuddin: मी राज्याचा मंत्री म्हणून शपथ घेतो की..." : भारतीय क्रिकेट टीमच्या माजी कर्णधाराची नवी इनिंग

Mohammad Azharuddin Minister Telangana Government News: मोहम्मद अझहरुद्दीन तेलंगणा सरकारच्या मंत्रिमंडळात सामील झाल्यानंतर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या कॅबिनेटमधील एकूण मंत्र्यांची संख्या 16 होईल, तर राज्यात कमाल 18 मंत्री असू शकतात.

Mangesh Mahale

तेलंगणा सरकारमध्ये लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. विधान परिषद आमदार आणि माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझहरुद्दीन यांना सरकारमध्ये मंत्री करण्यात येणार आहे. उद्या 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी ११ वाजता राजभवनात अझहरुद्दीन हे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

11 नोव्हेंबरला जुबली हिल्स विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर अझहरुद्दीन यांना मंत्री करण्यात आले असल्याचे बोलले जाते. जुबली हिल्स हा मतदारसंघ मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे. मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या सुमारे 30 टक्के आहे. अझहरुद्दीन यांना मंत्रिपद दिल्याने काँग्रेसला मोठा फायदा होणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. सध्या तेलंगण मंत्रिमंडळात एकही मुस्लिम आमदार नाही.

ज्युबिली हिल्स' पोटनिवडणुकीत भावनिक आणि प्रशासकीय अशा दोन्ही प्रकारे आघाडी मिळवण्यासाठी काँग्रेस अझहरुदीन यांना मंत्री बनवत आहेत. राज्यातील मुस्लिम लोकसंख्येला योग्य प्रतिनिधित्व देत असल्याचा संदेश रेड्डी सरकारला द्यायचा आहे. 'ज्युबिली हिल्स' विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मतदार मोठे असल्याने काँग्रेसने ही राजकीय खेळी खेळल्याचे बोलले जाते.

मोहम्मद अझहरुद्दीन तेलंगणा सरकारच्या मंत्रिमंडळात सामील झाल्यानंतर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या कॅबिनेटमधील एकूण मंत्र्यांची संख्या 16 होईल, तर राज्यात कमाल 18 मंत्री असू शकतात.

आमदार गोपीनाथ यांच्या निधनानंतर जुबली हिल्स मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. बीआरएसकडून मंगंती सुनीता गोपीनाथ, काँग्रेसकडून वल्लाला नवीन यादव आणि भाजपकडून लंकला दीपक रेड्डी हे उमेदवार रिंगणात आहेत. तिन्ही मोठ्या पक्षांकडून एकही मुस्लिम उमेदवार नाही.त्यामुळे काँग्रेस उमेदवाराला या निर्णयाचा फायदा होणार की नाही हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईल.

  • काँग्रेसने अझहरुद्दीन यांना मंत्री बनवून मुस्लिम समाजात आपला विश्वास अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केल्याचे समजते.

  • या मतदारसंघात सुमारे 3.90 लाख मतदार आहेत, त्यापैकी 1.20 ते 1.40 लाख मतदार मुस्लिम समाजातील आहेत.

  • ज्याला मुस्लिम मतांचा पाठिंबा मिळतो, त्या पक्षाच्या विजयाची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते.

  • या भागात मुस्लिम मतदार निवडणुकीचा निकाल ठरवण्यात निर्णायक भूमिका बजावतात.

  • जुबली हिल्स विधानसभा मतदारसंघात दर तिसरा मतदार मुस्लिम आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT